Essential Medicine Price Pudhari
आरोग्य

Essential Medicine Price: मोठा दिलासा! रक्तदाब, मधुमेहासह 39 अत्यावश्यक औषधांच्या किमती सरकारने ठरवल्या; खर्च होणार कमी

Essential Medicine Price: केंद्र सरकारने NPPA मार्फत रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार आणि संसर्गावरील 39 अत्यावश्यक औषधांच्या किरकोळ किमती निश्चित केल्या आहेत.

पुढारी वृत्तसेवा

Essential Medicine Price: आरोग्यसेवा कमी खर्चिक करण्याच्या दिशेने केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राष्ट्रीय औषध किंमत निर्धारण प्राधिकरणाने (NPPA) 39 अत्यावश्यक औषधांच्या किमती निश्चित केल्या आहेत. या निर्णयामुळे रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, संसर्ग आणि इतर गंभीर आजारांवरील अनेक औषधे कमी किंमतीत उपलब्ध होणार आहेत. सरकारच्या या निर्णयाचा फायदा लाखो रुग्णांना होणार असून औषधांच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल.

कोणत्या औषधांचा समावेश?

नवीन दर निश्चित करण्यात आलेल्या औषधांमध्ये रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, कोलेस्टेरॉल, संसर्ग, डोळ्यांचे आजार आणि व्हिटॅमिन डी यांसह विविध औषधांचा समावेश आहे.

यामध्ये प्रामुख्याने खालील प्रकारच्या औषधांचा समावेश करण्यात आला आहे:

  • उच्च रक्तदाबावरील औषधे

  • मधुमेहावरील औषधे

  • हृदयविकारावरील औषधे

  • कोलेस्टेरॉल कमी करणारी औषधे

  • अँटिबायोटिक्स

  • डोळ्यांसाठी वापरली जाणारी औषधे

  • व्हिटॅमिन डी पूरक औषधे

  • काही विशेष इंजेक्शन्स आणि ओरल सोल्यूशन्स

Essential Medicine Price
Essential Medicine Price
Essential Medicine Price

फार्मा कंपन्यांसाठी कडक नियम

NPPA ने स्पष्ट केले आहे की, कोणतीही औषध उत्पादक कंपनी किंवा विक्रेता सरकारने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त किंमत आकारू शकणार नाही.

महत्त्वाचे नियम

  • सर्व औषध विक्रेते आणि वितरकांनी दुकानात औषधांच्या किमतींची यादी ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक असेल.

  • ग्राहकांना किंमती सहज पाहता याव्यात यासाठी ही यादी दुकानाच्या दर्शनी भागात लावावी लागेल.

  • निश्चित दरापेक्षा जास्त किंमत आकारल्यास संबंधित कंपनीविरुद्ध कारवाई केली जाईल.

नियम मोडल्यास होणार कठोर कारवाई

जर एखाद्या कंपनीने सरकारने निश्चित केलेल्या किमतीपेक्षा जास्त रक्कम आकारली, तर आवश्यक वस्तू अधिनियम, 1955 अंतर्गत त्या अतिरिक्त रकमेची व्याजासह वसुली करून ती सरकारी तिजोरीत जमा केली जाणार आहे.

नवीन औषधांनाही लागू असतील नियम

भविष्यात या यादीतील औषधे नव्याने बाजारात आणणाऱ्या कंपन्यांनाही सरकारने निश्चित केलेल्या किमतींचे पालन करावे लागणार आहे. त्यामुळे सर्व कंपन्यांसाठी एकसमान किंमत धोरण लागू राहील.

रुग्णांना काय फायदा होणार?

या निर्णयामुळे अत्यावश्यक औषधांच्या किमतींमध्ये पारदर्शकता येणार असून रुग्णांना वाजवी दरात औषधे उपलब्ध होतील. विशेषतः रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकारासारख्या आजारांवर नियमित औषधे घेणाऱ्या रुग्णांचा खर्च कमी होण्यास मदत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT