Eggs and high cholesterol file photo
आरोग्य

Eggs and high cholesterol: अंड्यासोबत 'हे' पदार्थ खात असाल तर धोका! तज्ज्ञांचा धक्कादायक खुलासा

अंडी खायची की नाही? असा प्रश्न उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्या अनेकांना सतावत असतो. मात्र, आता या संभ्रमावर आरोग्य तज्ज्ञांनी मोठे स्पष्टीकरण दिले आहे. जाणून घ्या काय सुरक्षित आहे आणि काय नाही.

पुढारी वृत्तसेवा

Eggs and high cholesterol

नवी दिल्ली: अंडी खायची की नाही? असा प्रश्न उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्या अनेकांना सतावत असतो. मात्र, आता या संभ्रमावर आरोग्य तज्ज्ञांनी मोठे स्पष्टीकरण दिले आहे. अनेक वर्षांपासून अंड्याच्या बलकातील कोलेस्ट्रॉलमुळे हृदयाला धोका असल्याचा जो समज होता, तो आता पूर्णपणे खरा नाही. नवीन संशोधन आणि तज्ज्ञांच्या मते, उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्या लोकांसाठी अंडी सुरक्षित आहेत का? याचे उत्तर सरळ 'होय' किंवा 'नाही' असे नसले तरी, बहुतेक लोकांसाठी दिवसातून एक अंडे खाणे सुरक्षित आहे.

कोलेस्ट्रॉल वाढीला अंडे नाही, तर 'सॅचुरेटेड फॅट' जबाबदार

डॉ. सुधीर कुमार (यांनी 'X' वर @hyderabaddoctor या हँडलने सविस्तर सल्ला दिला आहे) आणि हार्वर्ड हेल्थ अहवालाच्या आधारे टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे. आपल्या शरीरातील बहुतेक कोलेस्ट्रॉल यकृत तयार करते. या कोलेस्ट्रॉलला उत्तेजित करण्यासाठी अंड्यापेक्षा लोणी, बेकन किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ यातील 'संतृप्त फॅट' आणि 'ट्रान्स फॅट' अधिक कारणीभूत ठरतात. एका मोठ्या अंड्यात फक्त १.५ ग्रॅम संतृप्त फॅट असते. यामुळे ते रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल वाढविण्यात मुख्य भूमिका घेत नाही.

तज्ज्ञ सांगतात की, उच्च कोलेस्ट्रॉल पातळी असलेल्या बहुतेक लोकांसाठी, अंडी पूर्वी समजली जात होती तितकी धोकादायक नाहीत. उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्या सामान्य व्यक्तीसाठी दिवसातून एक अंडे सेवन करणे साधारणपणे सुरक्षित आहे. हार्वर्ड हेल्थने अहवाल दिला आहे की, अभ्यासामध्ये जे लोक रोज एका अंड्याचे सेवन करतात त्यांच्यात हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका जास्त आढळलेला नाही.

काय सुरक्षित, काय धोकादायक?

तज्ज्ञांच्या मते, अंड्यापेक्षा ते कसे शिजवले जाते आणि त्यासोबत काय खाल्ले जाते, यावर खरा धोका अवलंबून असतो. उकडलेली किंवा कमी तेलात बनवलेले ऑम्लेट खा. अंड्यासोबत ओट्स, भाज्या आणि सॅलडचे सेवन करा, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलचे शोषण नैसर्गिकरित्या कमी होऊ शकते. तळलेले किंवा लोणी किंवा चीज घालून शिजवलेली अंडी टाळा, कारण हे घटक अंड्याच्या बलकापेक्षा एलडीएल अधिक वाढवतात. हार्वर्ड हेल्थच्या मते, बहुतेक लोकांसाठी अंडे ही समस्या नाही. खरा धोका अंड्यासोबत खात असलेल्या पदार्थांमध्ये आहे. बेकन, सॉसेज, चीज, मफिन्स, पेस्ट्री आणि तळलेले पदार्थ. या पदार्थांमध्ये संतृप्त फॅट आणि प्रक्रिया केलेले कर्बोदके असतात, जे अंड्यापेक्षा एलडीएल खूप जास्त प्रमाणात वाढवतात.

कोणी अधिक काळजी घ्यावी?

काही लोकांना अधिक कठोर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे कारण त्यांचा मूळ धोका आधीच जास्त आहे. फॅमिलीअल हायपरकोलेस्ट्रोलेमिया, खूप उच्च एलडीएल, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, मधुमेह, या लोकांनी अंडे खाणे टाळावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT