कृषी विभाग आणि स्वयंसेवी संस्थांच्या वतीने अनेक ठिकाणी रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. खते व कीटकनाशकांमुळे अलीकडे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रानभाज्या महोत्सवाच्या माध्यमातून मिळणार्या भाज्या आहारात घेतल्यास प्रकृतीला त्या फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. मानवी आरोग्याला सकस आहार आवश्यक असतो, अशा प्रकारचा आहार रानभाज्यांमधून मिळतो.
आयोजनामागील हेतू
* नागरी विभागातील लोकांना आदिवासी संस्कृतीची ओळख होण्यास मदत.
* फळभाज्या, कंद, शेंगा या पारंपरिक भाज्यांत असतात औषधी गुणधर्म.
* महिला बचत गट, आदिवासी भागात काम करणार्या संस्थांना आर्थिक लाभ.
* डोंगराळ भागातील आदिवासींना औषधी वनस्पतींची असते माहिती.
* प्रत्येक भाज्यांमध्ये लोह, तंतुमय पदार्थ, इतर खनिजे विपूल प्रमाणात असतात.
* महाराष्ट्रात 84 वेगवेगळ्या कुळांतील 314 प्रजाती रानभाजी म्हणून ओळखल्या जातात.
* 19 टक्के वनस्पती पालेभाजी स्वरूपात तर उर्वरित फुले, फळ, कंद, खोड प्रकारात मोडतात.
* रानभाज्यांचा वापर धार्मिक कार्यातही केला जातो. काही भाज्या साठवणुकीच्या स्वरूपातही वापरल्या जातात.
* रानभाज्या प्रामुख्याने पावसाळ्यानंतर मिळतात. यंदा पावसाळा लांबल्याने रानभाज्या महोत्सवांचे आयोजन नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांत करण्यात आले आहे.