आरोग्य

उन्हाळ्यात का खावे कलिंगड, जाणून घ्या फायदे

Pudhari News

डॉ. सौ. शुभांगी पार्टे

उन्हाळा म्हटलं की, नक्‍कीच आपल्याला काहीतरी थंड खाण्याची किंवा पिण्याची भावना निर्माण होते. म्हणजे शरीराला आतूनच तशी जाणीव होत असते. आपण थोडे शांत मन ठेवून आपल्या शरीराचे अवलोकन केले की, आपल्याला कळत असतं की, आपल्याला या क्षणी कशाची गरज आहे. मग, ते खाण्या-पिण्यातील असेल, विश्रांती असेल किंवा आणखी काहीतरी!

तसं उन्हाळा म्हटलं की, आपल्याला फळांमधील कलिंगड, काकडी यासारख्या फळांची लगेचच आठवण होते. कलिंगड आपण पावसाळ्यात किंवा थंडीत खा म्हटलं, तर आपणास इच्छासुद्धा होणार नाही. निसर्गाने देखील ते उन्हाळ्यातच खाण्यासाठी म्हणून त्याच ऋतूमध्ये त्यांची निर्मिती केलेली आहे. 

– कलिंगडामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे, खनिजेे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे घटक आहेत. कमी calories आहेत. त्यामुळे वजन वाढण्याचा प्रश्‍नच येत नाही.

कलिंगडाच्या पिकासाठी साधारणपणे 25 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान लागते. 100 ग्रॅम कलिंगडामध्ये जीवनसत्त्व B भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे बेरिबेरी, सतत उष्णतेचा त्रास, तोंड येणे, लघवीची तक्रार इ. होत नाही. 

कलिंगडामध्ये व्हिटॅमिन अ-(4 टक्के), थायमिन – (3 टक्के), रायबोफ्लॅविन-(2 टक्के), नियासिन -(1 टक्के), पेन्टोथेनिक अ‍ॅसिड-(4 टक्के), व्हिटॅमीन इ 6 (3 टक्के), कोलीन -(1 टक्के), व्हिटॅमीन उ- (10 टक्के), मिनरल (खनिजे), कॅल्शियम – (1 टक्के), आयर्न- (2 टक्के), मॅग्‍नेशियम- (3 टक्के), मॅगेनिझ- (2 टक्के), फॉस्फरस (2 टक्के), पोटॅशियम (2 टक्के), सोडियम -(0 टक्के), झिंक -(1 टक्के) असते.

कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण सुमारे 92 टक्के असते. साखर 6 टक्के असते, तर फॅट खूपच कमी असते. 100 ग्रॅम कलिंगडामधून 30 टक्के कॅलरीज मिळतात. 

कलिंगडामध्ये जास्त प्रमाणात A जीवनसत्त्व असते. अ जीवनसत्त्वामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. त्यामुळे सतत हाता-पायाची धग होणे, तोंड येणे, लघवीला जळजळ होणे अशा तक्रारी होत नाहीत. 

'अ' जीवनसत्त्वामुळे केसांना आणि त्वचेला पोषण मिळते.

उन्हाळ्यात घाम जाऊन येणारा थकवाही कमी होतो. 

कलिंगडामध्ये असणारे लायकोपेन हे अमायनो अ‍ॅसिड सिटूलिनचे अमायनो अ‍ॅसिड अरगिनाईनमध्ये बदलते आणि सुरळीत रक्‍त प्रवाह होण्यास मदत करून हृदयाची कार्यक्षमता वाढविते. 

मांसपेशीतील ताकद वाढवून अचानक गोळे येणे, मांसात मांस अडकणे इ. लक्षणांपासून बचाव होतो. 

पेशींना असणारी सूज किंवा झीज मग ती स्मोकिंग, पोल्यूशन किंवा स्ट्रेसमुळे किंवा आजारामुळे असेल, तर ती कमी होण्यास मदत होते. 

कलिंगडाच्या रसामध्ये इलेक्ट्रोलाईटस् असल्याने हृदयविकाराच्या झटक्यापासून बचाव होण्यास मदत होते. 

कलिंगड तहान भागविणारे असल्यामुळे शरीरातील रसधातू पोषक म्हणून कार्य करते. 

त्यामधील तंतूमुळे पचन व्यवस्थित होऊन पोट साफ होण्यास मदत होते. 

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटद्वारे प्रसिद्ध केलेल्या पेपरमध्ये कलिंगड हे अँटिऑक्सिडंट म्हणून काम करत असल्याने कॅन्सर पासून येणारा थकवा आणि औषधांमुळे वाढणार्‍या उष्णतेपासून होणारा त्रास थांबतो. 

कलिंगड हे वाजीकरणाचेही कार्य करते. 

कलिंगडाच्या बिया वाळवून त्या खाल्ल्या जातात, तसेच मिठाईमध्येही वापरल्या जातात. 

अशाप्रकारे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तेलकट पदार्थ खाण्याऐवजी कलिंगड जरूर खावे. त्यामुळे शरीराला नैसर्गिक थंडावा मिळतो. 

 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT