पुढारी ऑनलाईन डेस्क
सेक्स (sex) हा आनंदी सहजीवनाच्या अनेक रहस्यांपैकी ते एक महत्त्वपूर्ण रहस्य आहे, असे अनेक संशोधकांचे मत आहे. आनंददायी सेक्स जीवन तुम्हाला दीर्घ काळापर्यंत एकमेकांशी बांधून ठेवते. पण पुरुष त्यांचे सेक्स लाईफ त्यांच्या मित्रांना सांगतात का? याचविषयी लैंगिक समस्या तज्ञ डॉ. राहुल पाटील यांना विचारले असता त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
डॉ. राहुल पाटील सांगतात, सर्व नाही पण काही पुरुष त्यांचे सेक्स लाईफ त्यांच्या मित्रांना सांगतात. ते मित्रांशी आपल्या सेक्स जीवनाबद्दल चर्चा करताना विनोद करत, खोटे, वाढवून सांगतात. तर काही अगदी खरंच गंभीर होऊन देखील सांगतात. पण दुसऱ्याच्या सेक्स लाईफ बरोबर तुलना करणे गरजेचं नाही. अशा चर्चांमुंळे अवास्तव अपेक्षा वाढतात, जोडीदाराबरोबर वाद होण्याची शक्यता असते. तर काही मित्र चांगला सल्ला देऊन अडचणीत असलेल्या मित्राला तज्ज्ञ डॉक्टरकडे घेऊनही जातात. काहीवेळी परस्पर मित्रांनी सांगितलेली गोळी घेणे असे होते, जे धोक्याचे ठरू शकते. मित्रांचे काही ऐकले तरी खरे-खोटे याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.
दररोज हस्तमैथुन केल्याने ताकद कमी होते?
स्त्री पुरुषांमध्ये 'सेक्स'ची इच्छा जास्त असणे ही समस्या आहे का?
सेक्स अर्धवट झाल्यास शरीरावर वाईट परिणाम होतो का?
सेक्समधे स्त्रीला पुरुषाचा धुसमुसळेपणा आवडतो का? याविषयी बोलताना डॉ. राहुल पाटील म्हणाले की, स्त्रीला कामुक करण्यासाठी हळुवारपणे चुंबन घेणे. स्तनाला हळूहळू कुरवाळणे. कामुक स्थळांना हळूवार स्पर्श करून तिची वासना वाढवणे हे आवडते. नेमके स्त्री नग्न झाली, की पटकन सगळे उरकून टाकणे याकडे पुरुषांचा कल असतो. हे मात्र स्त्रीला आवडत नसते. काही स्त्रिया गप्प बसतात, तर काही हे स्पष्ट बोलून दाखवतात. लैंगिक आवड-निवड, त्याच्या पध्दती या उघडपणे बोलले तर फायद्याचे ठरते, असं ते सांगतात.
विविध पोझिशन्समध्ये SEX करणे कितपत सुरक्षीत आहे?
शुक्राणूंची संख्या कमी वा जास्त असणं हे अनुवंशिक आहे?