आरोग्य

वायू प्रदूषण टाळण्यासाठी शरीराला करा अशा प्रकारे डिटॉक्स

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क: अनेक शहरांमध्ये हवेच्या प्रदूषणाची पातळी मर्यादेबाहेर गेली असून दिवाळीनंतर प्रदूषणात आणखी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत फुफ्फुस आणि हृदयाच्या गंभीर आजारांना बळी पडू शकतात. हे टाळण्यासाठी आपण आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. जेणेकरून आपण आतून मजबूत राहाल आणि रोगांवर नियंत्रण ठेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला शरीर डिटॉक्स करण्याचे काही उपाय सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही सुरक्षित राहू शकता.

तुळशी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. याच्या सेवनाने तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. तुमचे फुफ्फुस स्वच्छ करण्यास मदत करते. रोज तुळशीचा चहाचे सेवन करा, हवे असल्यास तुळशीची पाने धुवून खाऊ शकता.

हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात. शरीरातील अनेक आजार बरे करण्यासाठी हे उपयुक्त ठरते. हळदीचे सेवन केल्याने फुफ्फुसातील संसर्ग टाळू शकता. तुम्ही गरम दुधात हळद मिसळून सेवन करा, तुम्हाला त्याचा फायदा होईल.

तूप तुमच्या शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते. जेवणात तूप समाविष्ट करू शकता. तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही तुपानेही शरीराला मसाज करू शकता.

वाढत्या प्रदूषणामुळे डोळ्यात जळजळ होण्याची समस्या निर्माण झाली आहे. हे टाळण्यासाठी रोज डोळ्यात गुलाब पाण्याचे थेंब टाका. यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

तुम्ही काळी मिरी मधात मिसळूनही खाऊ शकता. हे तुमच्या फुफ्फुसातील घाण बाहेर काढण्यास मदत करते.

घराबाहेर पडताना मास्क घालायला विसरू नका. एकच मास्क रोज वापरू नका हे लक्षात ठेवा. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही धुतल्यानंतर मास्क वापरू शकता किंवा नवीन मास्क घालू शकता.

टीप : लेखात दिलेल्या टिपा आणि युक्त्या केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहेत आणि व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून घेऊ नये. तुम्हाला काही प्रश्न किंवा समस्या असल्यास, ताबडतोब तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

SCROLL FOR NEXT