Benefits Of Dates File Photo
आरोग्य

Benefits Of Dates | फायदे खजूर सेवनाचे

पुढारी वृत्तसेवा

डॉ. गौरांगी वैद्य

खजूरामध्ये कोलेस्ट्रॉल नसते तसेच त्यात चरबीचे प्रमाणही अत्यंत कमी असते. खजूर लॅक्साटिव्ह फूड प्रकारातील आहे. त्यात खूप अधिक प्रमाणात विरघळणारे तंतुमय पदार्थ असतात. त्यामुळे पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. खजूर रात्रभर भिजवून ठेवून सकाळी त्या पाण्यासह खाल्ल्यास खजुराचा अत्याधिक फायदा होतो. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.

रक्ताल्पतेत फायदा : खजुरात लोहाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे खजूर खाल्ल्याने रक्त वाढते. जेव्हा रक्ताल्पता किंवा अॅनिमियाची कमतरता भासते तेव्हा खजुराचे नियमित सेवन केल्यास खूप खजूर हा जीवनसत्त्व आणि खनिजे यांचा उत्तम स्त्रोत आहे. त्यात कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि झिंक यांच्यासारखे आवश्यक खनिजे असतात तसेच थियामिन, रिवोफ्लेविन, नियासीन, फॉलेट, ए जीवनसत्त्व आणि क जीवनसत्त्व आढळते. फायदा होतो.

अॅलर्जीपासून बचाव : ऑरगॅनिक सल्फर हे खूप कमी खाद्यपदार्थामध्ये असते. खजुरामध्ये ते मुबलक आढळते. त्यामुळे ऋतुमानातील बदल आणि अॅलर्जिक रिअॅक्शन या सर्व धोक्यांपासून बचाव करण्यासाठी खजूर लाभदायक ठरतो.

हृदयाचे आरोग्य : खजुरात भरपूर प्रमाणात पोटॅशिअम आणि सोडियम खूप कमी प्रमाणात असते. त्यामुळे आपल्या मज्जा संस्था आणि हृदयाचे आरोग्य राखण्यास फायदा होतो.

ऊर्जावृद्धी : खजुरात ग्लुकोज, सुक्रोज आणि फ्रक्टोजसारखी नैसर्गिक शर्करा असते ज्यामुळे ऊर्जा वाढवण्यास मदत होते. खजुरात कॅलरीजचे प्रमाण कमी असते. त्यामुळे वजन आणि तंदुरुस्तीचा विचार करणाऱ्या लोकांसाठी खजूर उपयुक्त आहे.

हाडांची बळकटी : खजुरामध्ये सेलेनियम, कॉपर आणि मॅग्नेशियम हाडांना मजबूत आणि तंदुरुस्त बनवते. मुलांना डेट मिल्क म्हणजेच खजूर आणि दूध असे एकत्र करून मिक्सरमधून फिरवून दिल्यास त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT