Children's dental health and toothpaste selection | मुलांचे दंतारोग्य आणि टूथपेस्टची निवड 
आरोग्य

Children's dental health and toothpaste selection | मुलांचे दंतारोग्य आणि टूथपेस्टची निवड

पुढारी वृत्तसेवा

डॉ. रवी मलिक

घरात जेव्हा एकच टूथपेस्ट असते, तेव्हा अनेक पालकांच्या मनात प्रश्न येतो की, मुलेही तीच टूथपेस्ट वापरू शकतात का? मुलांचे दात अतिशय नाजूक असतात. त्यामुळे त्यांच्या स्वच्छतेबाबत थोडाही निष्काळजीपणा भविष्यात मोठी समस्या निर्माण करू शकतो.

मुले मोठ्यांचे नॉर्मल एडल्ट टूथपेस्ट वापरू शकतात. टूथपेस्टमधील फ्लोराईडचे प्रमाण. फ्लोराईड दातांना मजबूत बनवते आणि कॅव्हिटीपासून (दातांची कीड) संरक्षण करते. लहान मुलांसाठी ‘फ्लोराईड’चे प्रमाण 1000 पीपीएमपेक्षा कमी असावे. फ्लोराईड नसलेले टूथपेस्ट मुलांसाठी योग्य मानले जात नाही, कारण त्यामुळे दात सडण्याचा धोका वाढतो. वयोगटानुसार टूथपेस्टचे प्रमाण कसे असावे, हेही लक्षात घ्यायला हवे.

सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील मुलांसाठी टूथपेस्ट’ची मात्रा केवळ तांदळाच्या दाण्या इतकीच असावी. या वयातील मुलांना थुंकणे जमत नाही, त्यामुळे जास्त टूथपेस्ट देणे टाळावे. ही कमी मात्रा दातांच्या स्वच्छतेसाठी पुरेशी आणि मुलांसाठी सुरक्षित असते. तीन ते सहा वर्षे वयोगटातील मुले थोड्या चांगल्या प्रकारे ब्रश करायला शिकतात. या वयात मटारच्या दाण्या इतकी टूथपेस्ट देणे योग्य ठरते. या मुलांसाठी 1000 ते 1500 पीपीएम पर्यंत फ्लोराईड असलेले टूथपेस्ट वापरता येते.

सहा वर्षांनंतर मुले व्यवस्थित गुळण्या करायला आणि थुंकायला शिकतात. त्यामुळे सहा ते बारा वर्षे वयोगटातील मुले मोठ्यांचे टूथपेस्ट सामान्य प्रमाणात वापरू शकतात. या वयात मुले टूथपेस्ट गिळण्याऐवजी बाहेर थुंकत असल्याने धोका राहत नाही. पालकांनी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवावी की, टूथपेस्टमध्ये फ्लोराईड असणे आवश्यक आहे. फ्लोराईड हे दातांसाठी एक प्रकारचे सुरक्षा कवच असून ते कीड आणि सडण्यापासून दातांचे रक्षण करते. त्यामुळे मुलांसाठी टूथपेस्ट निवडताना नेहमी त्यातील फ्लोराईडचे प्रमाण तपासून घ्यावे.

थोडक्यात सांगायचे तर, टूथपेस्ट घेताना त्यातील फ्लोराईड’ची मात्रा तपासणे सर्वात महत्त्वाचे आहे. फ्लोराईड हे दातांसाठी एक प्रकारचे सुरक्षा कवच म्हणून काम करते. योग्य प्रमाणात याचा वापर केल्यास मुलांचे दात निरोगी आणि मजबूत राहतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT