Bloating causes | पोटफुगीची कारणे 
आरोग्य

Bloating causes | पोटफुगीची कारणे

पुढारी वृत्तसेवा

डॉ. मनोज कुंभार

अति जेवणामुळे पोटात जो वायू तयार होतो त्यामुळे पोट फुगल्याची भावना बळावते असे वैद्यकशास्त्राचे म्हणणे आहे. अर्थात पोटात गॅस भरून राहण्याची वेगवेगळी कारणेही आहेत. पण पोटात वायू का निर्माण होते हे ओळखता आले तर फुगलेल्या पोटाच्या परिस्थितीपासून आपण लवकर सुटका मिळवू शकतो.

मलावरोध किंवा बद्धकोष्ठता : आतड्यांमध्ये वायू अडकल्याने बद्धकोष्ठता निर्माण होते. काही विशिष्ठ आहार जेवणात सामील केल्यास बद्धकोष्ठता टाळता येईल. मैद्याच्या ब्रेडऐवजी गव्हाचा ब्रेड हा बद्धकोष्ठता असणा़र्‍या लोकांनी समाविष्ट करावा. अर्थात तंतुमय पदार्थांचे अतिसेवनही नक्कीच वाईट असते. पण प्रमाणात खाल्ल्यास नक्कीच फायदेशीर ठरेल.

कार्बोहायड्रेटस : कोणत्याही गोष्टीचे अतिप्रमाण टाळावेच. पण साखर, अल्कोहोल आणि स्टार्च या गोष्टींचे सेवन शक्यतो टाळावे. साखर आणि स्टार्चचे पचन न झाल्यास पोट फुगल्याची भावना निर्माण होते. त्यामुळे कार्बोहायड्रेटसचे अत्यल्प प्रमाण असलेला आहार असावा. फळांमध्ये स्मूदीज, बेरी प्रकारातील फळांचा अवश्य समावेश करावा. त्याशिवाय भाज्याही या त्रासात आपल्याला पोटातील वायू कमी करण्यास मदत करतील.

ताण : अतिताणामुळेही आपल्याला पोट दुखी आणि पोटफुगी होऊ शकते.

पाणी : पाणी आपल्या शरीराचा जास्तीत जास्त भाग व्यापणारा घटक आहे. त्यामुळे पाण्याचे कमी सेवन हा देखील पोट फुगीच्या त्रासातील महत्त्वाचा भाग आहे. कमी पाणी प्यायल्याने अऩेक रोगांना आमंत्रण मिळते आणि आरोग्याच्या तक्रारी सुरु होतात. कॉफी, किंवा चहा त्यातील साखर शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी करते. फुगलेले पोट हे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याचे निदर्शक आहे.

खाण्याची अतिघाई : वेळेच्या मागे लागून घाई घाई ने खाण्याची आपल्याला सवयच लागून गेली आहे. पण आपले जेवण शांतपणे मजा घेत खा. सावकाश जेवा. आपण घाईने जेवल्यास घास नीट चावत नाही. त्यामुळे अन्नपचन होण्यास कठीण जाते आणि त्याचा परिणाम म्हणून पोट फुगते. जेवताना लहान घास घ्या आणि सावकाश प्रत्येक घास चावून खा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT