सतत स्क्रीन समोर असणे, अतिताण, अति आरामदायी जीवनशैली ही सगळी निद्रनाशाची प्रमुख कारणे आहेत. अलीकडे झोप न येणे ही अनेकांची तक्रार असते. शरीराला आराम आणि मेंदूला पुरेशी विश्रांती न मिळाल्याने अनेक आजार डोके वर काढतात. आपण बाह्य आजारांवर उपचार करत राहतो. पण शरीराशी निगडीत मूलभूत घटकांना आणि गरजांना सोयीस्कर विसरतो. पण तुम्हाला माहिती आहे का ? काही हर्बल चहा रात्री झोप येण्यासाठी मदत करतात. पाहुयात कोण कोणते चहा आहेत हे....
कॅमोमाईल टी :
कॅमोमाईलच्या फुलांपासून हा चहा बनवला जातो. यातील एपिगोनीन या घटकामुळे निद्रानाश कमी होण्यास मदत होते. याशिवाय हा चहा ताण कमी करण्यासही मदत करतो.
लॅवेंडर टी :
झोपेच्या आधी दिवसभराच्या ताणाचा निचरा करण्यासाठी हा चहा अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतो. ताण कमी झाल्यास आपसूकच शांत झोप लागते.
पेपरमिंट टी :
लहानपणी पेपरमिंटच्या गोळ्या आपण सर्वांनी खाल्ल्या आहेत. मिंटचा सुगंध चित्तवृत्ती प्रफुल्लित करतो. या चहामुळे मांसपेशीवरील ताण सैलावतो. त्यामुळे रीलॅक्स वाटून झोप लवकर लागण्यास मदत मिळते.
दालचीनी टी :
दालचीनी हा प्रत्येक घरात आढळणारा मसल्याचा पदार्थ आहे. अनेक आजारांवर दालचीनी हे गुणकारी औषध आहे. पोटाच्या अनेक समस्यांवर दालचीनी काम करते. याशिवाय रात्री झोप लागण्यास मदत करते.