Cancer : भारतात कॅन्सरचे लक्षावधी रुग्ण असून कोरोना महामारीच्या काळातही ही संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. मोठ्या संख्येने लोक स्तन, गर्भाशय मुखाचा, तोंडांचा, फुफ्फुसाचा, आतड्याच्या कर्करोगाने ग्रस्त असल्याचे दिसून येते. वेळीच निदान व उपचाराने कर्करोग बरा करता येतो. तसेच आधुनिक उपचारप्रणालीत टार्गेटेड थेरपी रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. टार्गेटेड थेरपी म्हणजे एक प्रकारचा कर्करोगावरील उपचार, ज्यामध्ये विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाच्या पेशींवर हल्ला केला जातो.
टार्गेटेड थेरपी म्हणजे कर्करोगाच्या उपचारांपैकी एक प्रकार जो कर्करोगाच्या पेशींची वाढ, विभाजित होणे आणि पसरणे हे नियंत्रित करण्यासाठी ज्ञात असलेल्या प्रथिनांना लक्ष्य करते. टार्गेटेड थेरपी लहान-रेणू किंवा मोनोक्लोनल अँटिबॉडीजच्या स्वरूपात असतात. कोणत्या प्रकारची थेरपी रुग्णांसाठी योग्य आहे हे मात्र उपचार करणारे डॉक्टरच निदान करून ठरवतात. Cancer
Cancer : ही थेरपी उपचारासाठी निवडताना या थेरपीच्या दुष्परिणामांबद्दल डॉक्टरांशी बोलायला हवे. ही थेरपी घेत असलेल्या व्यक्तीला रक्त गोठणे आणि जखम होणे, उच्च रक्तदाब, थकवा, तोंडात फोड येणे, केसांचा रंग बदलणे आणि कोरडी त्वचा होणे अशा समस्या दिसून येऊ शकतात. या दुष्परिणामांवर मात करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावी लागतात. स्वतःच्या मनाने औषधे घेणे हे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. टार्गेटेड थेरपी ही रक्ताचा कर्करोग, मेंदूचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग, डोके आणि मानेचा कर्करोग, त्वचेचा कर्करोग आणि थायरॉईड ग्रंथीचा कर्करोग यावरील उपचारासाठी डॉक्टरांशी चर्चा करून वापरता येते.
हे ही वाचा :