पुढारी ऑनलाईन डेस्क
एखाद्या खेळाडूला लैंगिक जीवनात अशी अडचण येऊ शकते का की तो स्नायूच्या दुखापतीमुळे खेळ खेळण्यास असमर्थ ठरू शकेल? आता या विषयाबद्दल चर्चा करण्याच कारण म्हणजे ऑस्ट्रेलियाचा दुखापतग्रस्त क्रिकेटर डेव्हिड वॉर्नर. रविवारी भारताविरुद्ध झालेल्या दुस-या वनडेत वॉर्नरचा मांडीचा स्नायू दुखावला गेला. त्यामुळे त्याला मैदानाबाहेर पडावे लागले. ही दुखापत गंभीर असल्यानं त्याला तिस-या वनडे सामन्यात खेळता आलं नाही.
दरम्यान वॉर्नरची पत्नी (candice)ने आपला पती डेव्हिड वॉर्नरला दुखापत का झाली याचं कारण सांगितलं आहे. तिने अनेक महिन्यानंतर वॉर्नर घरी आल्यानंतर आम्ही सगळे कपल जे करतात तेच केले. वॉर्नरच्या दुखापतीला आपणही हातभार लावल्याचे पत्नीनं गंमतीने म्हटले.
आता वॉर्नरच्या पत्नीने हा विषय गमतीनं जरी सांगितला असला तरी याविषयी लैंगिक समस्या तज्ञ डॉ. राहुल पाटील यांनी आपले मत व्यक्त केले आहे. डॉ. पाटील म्हणतात की, संभोगादरम्यान सौम्य ते तीव्र स्वरूपाची कोणतीही इजा होऊ शकते. मात्र, याला अनेक कारणं आहेत.
या कारणांबाबत बोलताना डॉ. पाटील यांनी सांगितले की, संभोग करताना जोडप्यानं कोणतं आसन केले आहे हा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्याच्यबरोबर दोघांचे वजन तसेच त्यांनी कितीवेळ संभोग सेक्स केला? घाई गडबडीत संभोग केला का? दारूच्या नशेत सेक्स केला का? हे प्रश्नही महत्त्वाचे आहेत. त्यानुसार लिंग, कंबर, मान, खुबा, छाती, ओटीपोट, वृषण ग्रंथी इथे कुठेही दुखापत होऊ शकते.
डॉ. राहुल पाटील पुढे म्हणाले की, लचकने तीव्र असेल तर खुबा, कंबर इथे हालचाल करणे देखील अवघड होते. प्रत्येक व्यक्ती गणिक समस्या बदलू शकते. याचा अर्थ प्रत्येक संभोगावेळी असं होईलच असं नाही.