पुढारी ऑनलाईन डेस्क
प्रत्येक सजीव हा प्रजननाद्वारे अस्तित्वात आलेला असतो. मानवामध्ये प्रजनन लैंगिक पद्धतीने घडून येतं. अशातच आपण अनेकवेळा नपुंसकता हा शब्द ऐकलेला असतो. ऐकणा-याला किंवा बोलणा-याला त्यातून अमुकजण 'पुरुष- नाही' असे अभिप्रेत असते. स्त्री संबंध करू न शकणे हाच या मागचाचा अर्थ असतो. आता नपुंसक व्यक्ती बाप बनू शकते का?, याचविषयी लैंगिक समस्या तज्ञ डॉ. राहुल पाटील यांना विचारले असता त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
कोरोनामुळे लैंगिक समस्या येतात का?
लैंगिक समस्यांवरचे उपचार करताना कुणाच्या अतिअपेक्षा असतात? स्त्रियांच्या की पुरुषांच्या?
पहिला संभोग करताना कोणत्या अडचणी येतात?
सेक्स लाइफ रिचार्ज कशी करायची?
डॉ. राहुल पाटील सांगतात की, नपुंसकता म्हणजे लिंगाला कडकपणा न येणे किंवा आलेली टिकवता न येणे. आणि वंध्यत्व म्हणजे वीर्य सदोष असल्याने पिता बनू न शकणे. म्हणजे नपुंसकता आणि वंध्यत्व या वेगवेगळ्या समस्या आहेत. तरी एकाच व्यक्तीत दोन्ही समस्या एकाच वेळी असू शकतात. आणि पूर्ण आयुष्यात वेगवेगळ्या काळात देखील होऊ शकतात. नपुंसकता असलेल्या पुरुषामध्ये वीर्य नॉर्मल असेल तर तो व्यक्ती लिंग ताठरता येणारे औषध घेऊन, सेक्स करून पिता बनू शकतो. पण ताठरता चांगली आहे आणि वीर्य सदोष आहे तर तो सेक्स चांगला करेल पण बाप होऊ शकत नाही. त्यामुळे एखाद्याला नक्की काय समस्या आहे ते सविस्तर माहिती विचारून समजते. बोलीभाषेत हे दोन्ही शब्द कुठेही वापरले जातात यातून गैरसमज, वाद वाढतात.
नपुंसकत्वाचे काही प्रकार असतात का?
डॉ. राहुल पाटील सांगतात की, नपुंसकता म्हणजे पुरुष लिंगाला पुरेशी ताठरता न येणे किंवा आलेली ताठरता वीर्यपतन होईपर्यंत न टिकणे. यालाच इरेक्टाइल डिसफक्शन/इम्पोटंस असे म्हणतात. त्यामागे मानसिक आणि शारीरिक अशी दोन कारणे आहेत. vit D3, testosterone, रक्त, zinc यांच्या कमतरतेमुळे आणि prolactin संप्रेरक, cholesterol, creatinine, रक्तातील साखर यांच्या लेवल वाढल्याने नपुंसकता येते. कारण कोणतेही असले तरी सगळ्या केसमध्ये पहिले औषध sildenafil/ tadalafil हे वापरले जाते. काही गंभीर केसेसमध्ये लिंगात इंजेक्शन घेणे गरजेचे असते तसेच venous likage या समस्येवर शस्त्रक्रिया हा पर्याय आहे.
मानसिक कारणांमुळे आलेल्या समस्येवर आधी sex educate करावे लागते. त्यात तो क्लिअर झाला, तर एकाही गोळीची गरज नसते किंवा काही दिवस गोळी घ्यावी लागते. व्हाट्सप/गूगल विद्यापीठामधून शिकून स्वतः औषधे घेणे टाळा. तज्ञ डॉक्टरचा सल्ला, उपचार अपेक्षित. पेपरमधील जाहिराती, मलम, तेल, काही पावडर यावर विश्वास ठेवू नका, अशी माहिती डॉ. राहुल पाटील यांनी सांगीतले आहे.
विवाहपूर्व हस्तमैथुन केले तर विवाहानंतर सेक्स करण्याची इच्छा कमी होते का?
हस्तमैथुनाने वीर्यनाश होतो का?
दररोज हस्तमैथुन केल्याने ताकद कमी होते?
मुलामुलींच्या हस्तमैथुन करण्याने विवाहानंतर देखील त्यांना फायदा होतो का?