आरोग्य

फायदे एरंडेल तेलाचे | पुढारी

Pudhari News

— एरंडेलला अमृताची उपमा दिली आहे. याची  फुले, साल, पाने, मुळी, लाकूड सर्व काही उपयुक्त आहे. एरंडाचे कोळसेसुद्धा काही प्रमाणात मसाल्यात घालतात. आरोग्यासाठी हे उत्तम आहे.

— एरंडेल अंगास लावल्यास, पोटात घेतल्यास, डोके व तळ पायांना लावल्यास अतिशय उपयोग होतो.

— यामध्ये तांबडा आणि हिरवा असे दोन प्रकार आढळतात.

— तिखट, तीक्ष्ण, उष्ण, गोड, कडू, जड, स्वादू, सारक असे हे एरंडेल आहे. 

— कफ, ज्वर, खोकला, उदर, सूज, शूळ, कंबरदुखी, मस्तकातील शूल, दमा, कोड, गुल्म, प्लीहा, आम्लपित्त, उष्णता, वातरक्त, मेद, रक्तदोष, कृमी यांचा नाश करते.

— एरंडाच्या सालीचा रस काढून त्यात दूध घालू ते दूध रोज प्यावे. कसलीही कावीळ बरी होते.

— पोटात बारीक दुखत असेल, भूक लागत नसेल, अन्नाचे पचन होत नाही, अस्वस्थता वाटते, अपचन, करपट ढेकर, अन्नावर वासना नसणे अशा वेळी एरंड मुळाचा काढा एक अष्टमांश करावा व त्यामध्ये हिंग, पादेलोण, सुंठीची पूड घालून चार आठवडे घ्यावे.

— सांध्यांना वेदना होतात, सूज आहे, चालता येत नाही, उठता-बसता येत नाही, थोडा ताप आहे, कष्ट सहन होत नाही, अशा वेळी रोज सकाळी रात्री अर्धा ते एक तोळा एरंड तेल ज्वारीच्या पिठात घालावे व त्याची भाकरी दिवसातून दोन वेळा खावी.

— एरंडेल एरंडाच्या पानास लावून दुखर्‍या भागावर बांधावे. हाताची, पायाची हालचाल नियमित होते. यामुळे संधिवात अगर आमवात बरा होण्यास मदत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT