डॉ. अवधूत साठे
हिवाळा हा शरीराला उष्णता, ताकद आणि पोषण देणारा ऋतू आहे. या काळात आपली पचनशक्ती वाढलेली असते. त्यामुळे शरीराला पोषक अन्न आणि औषधींचा जास्तीत जास्त फायदा होतो.
अश्वगंधारिष्ट, अश्वगंधा पाक, कौंच पाक, मुसली पाक आणि धातुपौष्टिक चूर्ण हिवाळ्यात सर्वोत्तम लाभ देतात.
कौंच पाक : कौंच बियांनी बनलेला हा पाक पुरुषांसाठी श्रेष्ठ वृष्य (अॅफ्रोडिसिएक) आणि बल्य (टॉनिक) आहे. तो शुक्रधातूला पुष्ट करून वीर्याची गुणवत्ता आणि प्रमाण वाढवतो. व्यायाम करणार्यांसाठी ऊर्जा व सहनशक्ती (स्टॅनिमा आणि एंड्युरन्स) वाढवून जास्त वेळ वर्कआऊट करण्यास मदत करतो. टेस्टोस्टेरोन स्तर सुधारून मांसपेशींची वाढ आणि फिटनेसची उद्दिष्टे साध्य करण्यात सहायक ठरतो. हिवाळ्यात याचे सेवन केल्यास शरीराला बल, उष्णता आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व प्राप्त होते.
* वीर्याची गुणवत्ता व मात्रा वाढवणे : शुक्र धातू पुष्ट करून वीर्याचे प्रमाण वाढते आणि त्याची गुणवत्ता सुधारते.
. * टेस्टोस्टेरोन स्तर सुधारणा : नैसर्गिकरीत्या टेस्टोस्टेरोन हार्मोनची पातळीला सुधारते, जे कामेच्छा आणि कामक्रीडेसाठी महत्त्वपूर्ण ठरते.
* शारीरिक (लैंगिक) शक्ती आणि सहनशीलता : शरीराला आंतरिक शक्ती प्रदान करून लैंगिक शक्ती आणि स्टॅमिना वाढवते.
* कंपवातासही सहायक : कंपवात (पार्किसन्स) सारख्या तंत्रिकेशीसंबंधित समस्या दूर करण्यासही हा पाक मदत करतो. यामुळे शरीराचा समग्र ऊर्जा व समन्वय सुधारतो.
मुसळी पाक : सफेद मुसळीपासून बनलेला हा पाक प्राचीन काळापासून श्रेष्ठ पौष्टिक आणि वृष्य औषध मानले जाते. हे शारीरिक दुर्बलता, थकवा आणि शारीरिक कमजोरी दूर करते.
* स्त्रियांसाठी विशेष लाभ :
* गर्भाशयाची मजबुती : गर्भाशयाच्या मांसपेशींना खोल पोषण देते. गर्भाशयाची दुर्बलता दूर करून गर्भपात किंवा गर्भस्रावाचा धोका कमी करते.
* गर्भाचे पोषण : गर्भाशय गर्भाचे योग्य पोषण देण्यास सक्षम होते.
* हार्मोनल संतुलन व ऊर्जा : हार्मोनल संतुलन राखते, कामेच्छा वाढवते आणि शारीरिक दुर्बलता व थकवा दूर करते.
* पुरुषांसाठी विशेष लाभ : शीघ्रपतन : शुक्रधातू पुष्ट करून वीर्य घट्ट बनवते. तसेच शीघ्र स्खलनावर नियंत्रण वाढवते.
* इरेटाईल डिस्फंक्शन : लैंगिक शक्ती व कामेच्छा वाढवून जननेंद्रियातील रक्तसंचार सुधारते.
* धातुपौष्टिक चूर्ण : शुक्रधातू पुष्ट करणारे हे चूर्ण संपूर्ण शरीराला ऊर्जा व बल देते. शारीरिक शक्ती आणि आत्मविश्वास वाढवते, तसेच दीर्घकाळ सहनशक्ती टिकवते. जिम किंवा बॉडी बिल्डिंग करणार्या युवकांसाठी ताकद, सहनशक्ती व मांसपेशी विकासात मदत करते. नियमित सेवनाने शरीर सुद़ृढ, ऊर्जावान व आकर्षक दिसते.