सुरण. (File Photo)
आरोग्य

Healthy Suran| पौष्टिक सुरणचे असेही फायदे !

चविष्टच नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायक आहे. आयुर्वेदात सुरणाला विशेष महत्व आहे.

पुढारी वृत्तसेवा

कारण, त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. सुरणामध्ये फायबर, औटऑक्सिडंटस्, सी व बी ६. ही जीवनसत्वे, कॅल्शियम, पोटॅशियम, मंझेशियम, लोत भरपूर प्रमाणात असतात.

सुरणामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असल्यामुळे त्याच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता कमी होते, यातील नैसर्गिक प्रोबायोटिक्समुळे गॅस, अपयान आणि अॅसिडिटी यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

आयुर्वेदानुसार सुरण हा रकशुद्धीकारक आहे. तो पुरळ आणि त्वचेच्या इतर समस्या दूर करण्यास मदत करतो, सुरणाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे तो मधुमेहींसाठी फायदेशीर आहे. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवून इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारण्यासाठी मधुमेहींनी सुरणाचे सेवन आवर्जुन करावे.

सुरणामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असल्यामुळे तो रादाब नियंत्रित ठेवतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारतो कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासही सुरण लाभदायक ठरतो. यामध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंटस्मुळे फ्री रॅडिकल्सचा नाश होतो आणि कर्करोगापासून संरक्षण मिळते. सुरण खाण्यामुळे लवकर पोट भरल्यासारखे वाटते आणि अन्नाचे अतिरेकी सेवन टाळले जाते. त्यामुळे तो वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.

अर्थात, सुरण कच्चा खाणे टाळावे. तो वाफवून, उकडून किंवा भाजून खाणे अधिक चांगले. सुरणाची भाजी, भरीत किंवा सुरणाचे वडे हे चविष्ट आणि आरोग्यदायी पर्याय आहेत. काही लोकांना सुरणामुळे अॅलर्जी किंवा घशात खवखव होऊ शकते. थायरॉईड समस्या असलेल्या लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच सुरण खावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT