अमेरिका जेव्हा चंद्रावरही पोहोचली नव्हती तेव्हाची गोष्ट! 1960 साली झांबियाच्या एडवर्ड मुकुका कोलोसो या एका शिक्षकाने चक्क मंगळ मोहीम आखली होती.
या मोहिमेसाठी त्याने झांबियन सरकार व युनेस्कोकडे कोट्यवधी रुपयांची मागणी केली. कोलोसो मंगळावर दोन मांजरी, एक महिला व पुरुष अंतराळवीराला पाठवणार होता. अंतराळवीरांना अॅस्ट्रोनॉट ऐवजी 'आफ्रोनॉट' असा विचित्र शब्द कोलोसोने योजला होता.
मंगळावरच्या मोहिमेची पूर्वतयारी म्हणून त्याने चक्क प्रशिक्षण शिबिर आयोजित केले. गुरुत्वाकर्षण श्ाुन्यतेचा अनुभव यावा म्हणून त्याने प्रशिक्षार्थींना झोपाळ्यावर झोके घ्यायला लावले. आर्थिक मदत न मिळाल्यामुळे कोलोसोला ही मोहीम काही वर्षांत गुंडाळावी लागली. कोलोसो त्याच्या शेवटच्या पत्रकार परिषदेत म्हणाला, 'मी आज तुम्हाला एक वेडगळ मनुष्य वाटत असेन; पण एकेदिवशी झांबियाचा झेंडा चंद्र किंवा मंगळावर नक्कीच फडकेल.'