• ग्वाम या बेटावरील रस्ते हे कोरलपासून बनले आहेत. येथील समुद्रकिनाऱ्यावरची वाळू ही कोरलच्या जमिनीपासून बनली आहे. ज्यावेळी कॉक्रिट एकत्र करून रस्ते बांधण्यात आले, त्यावेळी नेहमीच्या वाळूऐवजी कोरलची वाळू वापरली.
-आलाबामामधील ग्रँटजवळील कॅथेड्रल कॅव्हेर्नस हे जगातील सर्वात मोठे गुहेचे द्वार असून, सर्वात मोठा चुनखडी स्तंभ आणि सर्वात मोठे चुनखडीचे जंगल आहे.
• माणसाप्रमाणेच प्राणीसुद्धा उजवे किंवा डावखुरे असतात. ध्रुवीय अस्वल हे डावखुरे असतात.
• QANTAS हे नाव ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय एअर लाईन्सचे असून, तिचे नाव 'क्विन्सलँड अँड नॉदर्न टेरिटोरीज एअर सर्व्हिस' या शब्दांच्या अद्याक्षरांपासून बनलेले आहे.
• जगातील लक्ष्यावधी झाडे ही खारींद्वारे अपघातानेच लावली जातात. कारण खारी अनेक प्रकारच्या बिया अन्नासाठी शोधून जमिनीत खड्डा करून लपवून ठेवतात आणि नंतर त्या कुठे ठेवल्या आहेत, हे विसरतात.
• मासे आणि कीटकांना पापण्यांसारखे कातडीचे आवरण नसते. त्यांच्या डोळ्यांचे संरक्षण कठीण भिंगांद्वारे होत असते.
• ऑस्ट्रेलियामध्ये १५० दशलक्षपेक्षा जास्त मेंढ्या आहेत आणि या देशाची लोकसंख्या २१ दशलक्ष आहे.