आई गॅसवर तवा ठेवून त्यावर जेव्हा चपाती भाजत असते त्यावेळी ती फुगते. अशी गरमागरम चपाती खाण्यासाठी आपण नेहमीच उत्सुक असतो. गरम फुगलेली चपाती खाताना बरेचदा भाजी आवडीची नसली तरीही मग ती खाल्ली जाते.
पण मित्रांनो, तव्यावर ठेवलेली ही चपाती का फुगते यामागचे शास्त्रीय कारण तुम्हाला माहीत आहे का? कणिक मळताना आपण गव्हाच्या पिठात पाणी टाकतो आणि मळलेल्या कणकेतून एक गोळा घेऊन त्याची चपाती बनवतो.
तव्यावर एक बाजू शेकल्यानंतर दुसरी बाजू जेव्हा उलटवतो त्यावेळी उष्णतेमुळे त्या कणकेतील पाण्याची वाफ होते. ही वाफ आणि तयार झालेला कार्बन डायऑक्साईड चपातीच्या दोन थरात राहतो. त्यातून तो बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत असतो. या दाबामुळे चपाती फुगते.
या फुगलेल्या चपातीला एखाद्या ठिकाणी छिद्र पडले तर हा तयार झालेला गॅस आणि वाफ त्यातून बाहेर पडते आणि चपाती पुन्हा आधीसारखी न फुगलेली राहते. बरेचदा या वाफेपुढे हात आला तर जोरात चटका बसतो. हेच तत्त्व कढईत तेलामध्ये पुऱ्या तळताना दिसून येते.
या दाबामुळे चपाती फुगते. या फुगलेल्या चपातीला एखाद्या ठिकाणी छिद्र पडले तर हा तयार झालेला गॅस आणि वाफ त्यातून बाहेर पडते आणि चपाती पुन्हा आधीसारखी न फुगलेली राहते. बरेचदा या वाफेपुढे हात आला तर जोरात चटका बसतो. हेच तत्त्व कढईत तेलामध्ये पुऱ्या तळताना दिसून येते.