अंकुर

चंद्रावर प्रत्यक्ष चालणार्‍या अंतराळवीरांची संख्या किती आहे?

Pudhari News

नील आर्मस्ट्राँग हा चंद्रावर चालणार पहिला अंतराळवीर आहे हे सर्वांनाच माहीत आहे. नील आर्मस्ट्राँग नंतर एकूण अकरा अंतराळवीर चंद्रावर विविध मोहिमांतर्गत प्रत्यक्ष उतरले. एडविन अल्ड्रिन, चार्लस कॉनरॅड, अ‍ॅलन बिन, अ‍ॅलन शेपर्ड, एडगर मिशेल, डेव्हिड स्कॉट, जेम्स आयर्विन, जॉन यंग, चार्लस ड्यूक ज्युनिअर, हॅरिसन श्मिट व चंद्रावर चालणारा अखेरचा अंतराळवीर युजिन सेर्नन असे एकूण बारा अंतराळवीर चंद्रावर उतरले. हे सर्व अंतराळवीर अमेरिका या एकाच देशाचे आहेत. युजिन सेर्नन 13 डिसेंबर 1972 रोजी चंद्रावर उतरला.

Tags : Ankur, What, number,  astronauts, operating, directly, moon

SCROLL FOR NEXT