मध्ययुगातील लोकांचे जीवन आजच्या जीवनापेक्षा वेगळे होते. मध्ययुगातील युरोपात सूर्य मावळला की लोक चक्क झोपायला जात. रात्री बारा-एक वाजेपर्यंत झोपल्यानंतर लोक उठायचे व दोन-चार तास जागे राहायचे. या काळात ते वाचन करायचे किंवा प्रार्थना करायचे. पहाटे सगळे पुन्हा झोपायला जात, ते सूर्य उगवल्यावरच उठत. एवढेच नाही तर लोकांनी लवकर उठावे, यासाठी राजाकडून खास माणसे नेमली जात. त्यांना 'नॉकर अपर' असे म्हटले जायचे.
या सरकारी नोकरांचे काम म्हणजे दररोज पहाटे लोकांचे दरवाजे हाताने किंवा काठीने ठोठावून त्यांना जागे करणे. वरच्या मजल्यावर राहणार्या लोकांना उठवण्यासाठी या 'नॉकर अपर'कडे खास युक्ती होती. कागदाची सुरनळी करून त्यातून फुंकर मारून हिरवे वाटाणे खिडक्यांच्या तावदानावर मारणे ही ती युक्ती. या आवाजामुळे लोक हमखास उठत.