जगभरात अनेक विचित्र व अविश्वसनीय अंधश्रद्धा आहेत. त्यातील काही तर हास्यास्पद आहेत. उदा. मेक्सिकोत दोन आरसे समोरासमोर ठेवणे अश्ाुभ मानले जाते. फिलिपीन्समध्ये स्मशानभूमीतून थेट घरात गेल्यास मृतात्मे त्या व्यक्तीसोबत येतात, असा समज आहे.
जपानमध्ये डोके उत्तरेकडे करून झोपणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे असा एक गैरसमज आहे. इजिप्तमध्ये कात्रीशी खेळणे चुकीचे मानले जाते. रवांडा या आफ्रिकन देशातील महिलांमध्ये एक अंधश्रद्धा आहे की, जर बकर्याचे मटण महिलांनी खाल्ले तर चेहर्यावर केस उगवतात. मध्ययुगातील युरोपात शिडीखालून जाणे अश्ाुभ मानले जायचे.
हॉलंडमध्ये जेवणाच्या टेबलावर गाणे सर्वात वाईट गोष्ट मानली जाते. स्पेनमध्ये एखाद्या घरात शिरताना डावा पाय प्रथम टाकणे दुर्भाग्य प्रदान करते असे मानतात. तर तुर्कस्तानमध्ये रात्री च्युइंगगम खाण्यास मनाई आहे. ब्रिटनमधील महिला त्यांचे तारुण्य अबाधित रहावे म्हणून खिशात एकॉर्न नावाचे फळ ठेवत असत. ब्राझिलमध्ये जर तुमची पर्स अथवा पैशाचे पाकीट यांचा स्पर्श जमिनीला झाला तर तुम्ही लवकरच कंगाल होणार अशी एक समजूत आहे.
13 हा आकडा युरोप व अमेरिकेत अश्ाुभ मानला जातो. एवढा अश्ाुभ की कित्येक इमारतीत 13 वा मजलाच नसतो. अनेक हॉटेल्समध्ये 13 क्रमांकाची खोली नसते. 13 तारीख जर श्ाुक्रवारी आली तर तो दिवस भयंकर अश्ाुभ मानला जातो.