अंकुर

भारत दर्शन : नेताजी सुभाषचंद्र बोस संग्रहालय

Pudhari News

आझाद हिंद सेनेचे सरसेनानी व भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा होता त्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 122 व्या जयंतीनिमित्त नवी दिल्‍लीतील लाल किल्ल्यात नेताजी सुभाषचंद्र बोस संग्रहालयाची स्थापना करण्यात आली आहे. हे संग्रहालय केवळ नेताजींनाच मानवंदना नाही तर आझाद हिंद सेनेच्या 43,000 सैनिकांचे अखंड स्मरणस्थान आहे.'और कुर्बानी' असे ब्रीदवाक्य असलेल्या नेताजी व आझाद हिंद सेनेसंबंधातील वस्तू या संग्रहालयात आहेत. नेताजींशी संबंधित कागदपत्रे, छायाचित्रे, युनिफॉर्म्स, शस्त्रे, पदके, खुर्च्या व टेबले या संग्रहालयात आहेत.

आझाद हिंद सेनेच्या सुमारे 26,000 सैनिकांना ब्रिटिशांशी लढताना वीरमरण आले त्यांची नावेही येथे पाहायला मिळतात. आझाद हिंद सेनेने केलेल्या पाच महत्त्वाच्या लढाया, सैनिकांचे पराक्रम, मिळवलेले विजय, आझाद हिंद सेनेचे महत्त्वाचे सेनानी यांची इत्यंभूत माहिती या संग्रहालयात आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार्‍या नेताजी सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी या संग्रहालयाला एकदा तरी भेट द्यायला हवी.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT