अंकुर

प्रत्युष: भारताचा सर्वात वेगवान महासंगणक | पुढारी

Pudhari News

भारत दर्शन 

'प्रत्युष' या शब्दाचा अर्थ होतो सूर्य. भारताच्या सर्वात  वेगवान महासंगणकासाठी हे नाव अगदी अचूक आहे. नववर्षाच्या  सुरुवातीला पुणे व नॉयडा येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मिटिरिऑलॉजी या संस्थेत या संगणकाला नुकतेच कार्यान्वित करण्यात आले. केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री हर्षवर्धन यांनी या संगणकाला राष्ट्रास समर्पित केले.

सामान्य संगणकाचा प्रोसेसिंग स्पीड गिगाहर्टझमध्ये मोजला जातो. मात्र, प्रत्युषसारख्या संगणकाचा वेग पेटाफ्लॉप या एककात  मोजला जातो. पुणे येथील प्रत्युषचा प्रोसेसिंग स्पीड 4 पेटाफ्लॉपस आहे तर नॉयडा येथील वेग 2.8 पेटाफ्लॉपस आहे. या महासंगणकाला बनवण्यासाठी सुमारे 450 कोटी रुपये खर्च आला. जगातील सर्वात 

वेगवान 500 महासंगणकामध्ये या संगणकाचा क्रमांक 30 वा आहे. या महासंगणकामुळे हवामानाविषयी अचूक अंदाज वर्तवण्यास शास्त्रज्ञांना मदत होणार आहे. हवामान व पर्यावरणविषयक अचूक अंदाज वर्तवणे, चक्रीवादळे आणि त्सुमानीबाबत लवकरात लवकर पूर्वसूचना देणे शास्त्रज्ञांना आता शक्य होणार आहे. कृषी, वीज  उत्पादन व जलसंधारण या तीन क्षेत्रात प्रत्युषची भूमिका आगामी काळात महत्त्वाची असेल.

 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT