लाकडाची लवचीकता मर्यादित असते. लाकडाला प्रमाणापेक्षा जास्त वाकवण्याचा प्रयत्न केल्यास लाकूड तुटू शकते. लाकडाच्या भुग्यापासून बनवल्या जाणार्या प्लायवूडच्या जाडीवर त्याची लवचीकता अवलंबून असते. 'डक्टा' या कंपनीने लवचीक लाकडाची निर्मिती केली आहे; जे मजबूत तर आहेच शिवाय लवचीकही आहे. लाकडाचा लगदा व लवचीक गोंदाचा वापर या लवचीक लाकडाच्या निर्मितीसाठी करण्यात आला आहे. याशिवाय लाकडाच्या तुकड्यांना विविध ठरावीक पॅटर्नमध्ये जोडून लवचीक लाकूड बनवण्यात आले आहे. इन्सिझन प्रक्रिया म्हणजे लाकडाला ठरावीक आकारात चिरा देऊन हे पॅटर्न बनवण्यात आले आहेत. पॅटर्ननुसार यांची नावे सोनार, लिनार, फोली, जानुस अशी आहेत. विविध सजावटीच्या कामांसाठी या लाकडाचा वापर करता येणे शक्य आहे. या लाकडामध्ये ध्वनिरोधक गुणधर्म असल्याने साउंडप्रूफ घरांच्या निर्मितीसाठीही याचा वापर करणे शक्य आहे. लवकरच हे लवचीक लाकूड व्यावसायिक उपयोगासाठी बाजारात आणले जाणार आहे.