अंकुर

रोग प्रतिबंधात्मक रुग्णालय | पुढारी

Pudhari News

आपण आजारी पडल्यावरच डॉक्टरकडे जातो, नाही का? आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जाऊन खिसा हलका करण्यापेक्षा रोग होऊच नये याची काळजी घेतली तर! अमेरिकेतील फोरवर्ड या रोग प्रतिबंधात्मक रुग्णालयाची संकल्पना नेमकी हीच आहे. एखाद्या आधुनिक जिमप्रमाणे हे रुग्णालय काम करते. अवघ्या 149 डॉलर्स प्रति महिना एवढ्या कमी खर्चात हे रुग्णालय ग्राहकांना रक्‍त चाचणी, वजन व्यवस्थापन, जनुकीय चाचणी, डॉक्टर्सद्वारे नियमित चाचणी, अशा अनेक सुविधा देते. यातील काही सुविधा, उदा. रक्‍त चाचणी अमर्यादित स्वरूपात दिल्या जातात.

अमेरिकेत रोग प्रतिबंधात्मक रुग्णालयाची संकल्पना आता चांगलीच रुळली आहे. रोगांवर महागडे उपचार करण्यापेक्षा रोग होऊच नये याची काळजी घेणे केव्हाही उत्तम हे आयुर्वेदातील तत्त्वच या प्रकारच्या रुग्णालयांनी अधोरेखित केले आहे, नाही का?

SCROLL FOR NEXT