4 simple steps for managing stress caused by events you cannot control
पुढारी ऑनलाईन : अलिकडचे काही महिने विक्रमी उष्ण ठरल्यामुळे तुम्हाला हवामानाबाबतची चिंता जाणवत आहे का? वाईट बातम्यांमुळे तणाव वाढतोय का? हार्ले स्ट्रीटवरील फोबिया तज्ज्ञ आणि Face Your Fears: 7 Steps to Conquering Phobias and Anxiety (£10.99, Michael O'Mara) या पुस्तकाचे लेखक क्रिस्टोफर पॉल जोन्स यांनी तुमच्या नियंत्रणाबाहेरील गोष्टींबद्दलची चिंता व्यवस्थापित करण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत.
“युद्धे, राजकीय उलथापालथ, उघड भ्रष्टाचार, हवामान बदल जग अस्थिर आहे आणि प्रत्यक्षात कोणाच्याही हातात नियंत्रण नाही, असे अनेकांना वाटणे स्वाभाविक आहे. कालांतराने याचा परिणाम झोप, एकाग्रता, संयम, नातेसंबंध आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होऊ शकतो. मात्र, यासाठी काही उपाय मदत करू शकतात.
शरीर शांत करा :
तुमचे शरीर आणि मन हे एकमेकांशी जोडलेले आहेत आणि एकाचा परिणाम दुसऱ्यावर होतो. चारपर्यंत हळूवार श्वास घ्या आणि सहापर्यंत मोजत श्वास सोडा. श्वासावर जोर न देता एक-दोन मिनिटे हे पुन्हा करा.
तुम्ही किती माहिती घेत आहात, यावर नियंत्रण ठेवा :
माहिती मिळवत राहिल्याने निर्णय घेण्यास मदत होऊ शकते. एक किंवा दोन विश्वासार्ह स्रोत निवडा आणि ठरावीक वेळेतच ते तपासा. बंद करा...
तुमच्या मनातील चिंता बाहेर काढा :
ज्या-ज्या गोष्टींची तुम्हाला चिंता वाटत आहे, त्या सर्व लिहून काढा. यामुळे त्या सर्व चिंता एका मोठ्या, असह्य समस्येसारख्या न वाटता स्वतंत्र विचार आहेत, हे लक्षात येण्यास मदत होते. तुमच्या यादीतील गोष्टी पाहण्यासाठी दररोज ठरावीक वेळी १० मिनिटे बाजूला ठेवा. आता प्रत्येक चिंतेकडे पाहा आणि स्वतःला विचारा : याबाबत मी प्रत्यक्षात काही करू शकतो का? मी आत्ताच काही कृती करू शकतो का, की त्यासाठी नंतरची वेळ ठरवण्याची गरज आहे? जर सध्या मी काहीच करू शकत नसेन, तर त्याबद्दल सतत विचार करत राहिल्याने काय साध्य होणार आहे?
तुमच्या नियंत्रणात काय आहे, हे ठरवा :
ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर आहेत, त्यांच्यावर भावनिक ऊर्जा खर्च करू नका. मोठ्या समस्यांची काळजी घेणे थांबवण्याची गरज नाही. तुमची चिंता कुठे उपयोगी कृतीमध्ये बदलू शकते आणि कुठे सततची चिंता केवळ तुमची ऊर्जा कमी करते, हे ओळखणे गरजेचे आहे.”