पुढारी ऑनलाईन डेस्क : कपड्यांच्या हॉट फॅशनने चर्चेत असलेल्या उर्फी जावेद विरोधात आता फतवा जारी करण्यात आला आहे. उर्फी विरोधात जारी केलेल्या फतव्याची प्रत सोशल मीडिया इन्फ्लुएंसर फैजान अंसारी यांनी समोर आणली आहे. उर्फीने इस्लामचा अपमान केला आहे. जेव्हा तिचा मृत्यू होईल तेव्हा तिला कब्रस्तानमध्ये दफन करण्यासाठी जागा मिळणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
उर्फी ज्या पद्धतीने कपडे परिधान करते यामुळे जगभरातील मुस्लिमांची बदनामी होत आहे. जर ती म्हणत असेल की ती इस्लाम मानत नाही तर तिने तिचे नाव बदलून टाकावे. जेव्हा कोणी म्हटले की मुस्लिम मुलगी असे कपडे वापरते तेव्हा खूप वाईट वाटते, असे फैजान अंसारी यांनी म्हटले आहे.
अंसारी यांनी पुढे म्हटले आहे की, त्यांनी उर्फी विरोधात फतवा जारी करण्यासाठी दिल्लीचे मौलाना आणि मुंबईतील काझी यांच्याकडेही तक्रार दिली आहे. उर्फीने तिचा धर्म बदलावा. तिने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. उर्फीने दिलेल्या मुलाखतीत ती मुस्लिम धर्म मानत नसल्याचे म्हटले आहे. यामुळे मुस्लिमांनी तिच्या विरोधात भूमिका घेतली आहे.
उर्फी जावेद सोशल मीडिया नेहमीच ॲक्टिव्ह असते. ती बोल्ड आणि विचित्र फॅशनमधील फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करते. यामुळे तिला अनेकवेळा ट्रोल करण्यात आले आहे.