पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू- काश्मीरला विशेषाधिकार बहाल करणारे ३७० कलम रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. या निर्णयाबाबत जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी भाजपला सवाल केला आहे. (Farooq Abdullah)
माध्यमांशी बोलत असताना नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला म्हणाले की, "मला कळत नाही की भाजपला नेहरूंविरुद्ध इतके विष का आहे. नेहरू कलम ३७० ला जबाबदार नाहीत. जेव्हा कलम (370) आणले गेले तेव्हा सरदार पटेल येथे होते आणि पंडित नेहरू अमेरिकेत होते. काश्मीरमध्ये निवडणुका व्हाव्यात अशी आमची इच्छा आहे; पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सप्टेंबरपर्यंत वेळ दिला होता."
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या राज्यसभेत बाेलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले हाेते की, " पं.जवाहरलाल नेहरु यांनी काश्मीरचा घोळ करून ठेवला आहे. आम्ही जम्मू-काश्मीरला योग्यवेळी संपूर्ण राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करू. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच अंतर्गत भाग आहे आणि तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही."
हेही वाचा