Latest

अपघात लाभाबाबत बळीराजा अनभिज्ञ ! सर्पदंश, वीज पडून, प्राण्यांच्या हल्ल्याने मृत्यू झाल्यास मिळते आर्थिक मदत

अमृता चौगुले

राजेंद्र जाधव : 

अकोले : शेती करताना अपघात, रस्ता, पाण्यात बुडून मृत्यू, किटकनाशके हाताळताना, विजेचा धक्का बसल्याने, वीज पडून, उंचावरून पडून, सर्पदंश, विंचूदंश, जनावरांचे हल्ले, दंगल विविध अपघातात शेतकर्‍यांचा मृत्यू झाल्यास त्या शेतकर्‍याच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळते, मात्र शासनाच्या या विविध योजनासंदर्भात अकोले तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांना प्रस्ताव सादर करण्याबाबत माहितीचं नसल्यामुळे प्रस्ताव सादर करण्यात येत नसल्याचे वास्तव कृषी कार्यालयात दिसले आहेत.

राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचे प्रस्ताव मंजुरीचे तालुकास्तरावरील तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समितीला देण्यात आले. अपघात घडल्यानंतर 30 दिवसांच्या आत परिपूर्ण प्रस्ताव वारसदारांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावयाचा आहे. यानंतर त्याची तपासणी करून त्वरित मदत वाटप थेट बँक खात्यात करण्याची कार्यवाही तालुका कृषी अधिकारी करणार आहेत. अकस्मिक, दुर्दैवी अपघातामुळे होणारे मृत्यू अथवा अपंगत्वासह आता बाळंतपणातील मृत्यूचादेखील या योजनेत समावेश झाला आहे. अपघाताच्या दिवशी स्वतः वहितधारक खातेदार असलेले शेतकरी व शेतकर्‍यांच्या कुटुंबातील खातेदार म्हणून नोंद नसलेला कोणताही एक सदस्य आई- वडील शेतकरी पती-पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी एक व्यक्ती, असे 10 ते 75 वर्षे वयोगटातील एकूण दोन जणांचा समावेश राहणार आहे.

अपघाती मृत्यू, तसेच अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव अथवा एक डोळा व एक अवयव कायमस्वरूपी निकामी झाल्यास 2 लाख रुपये, एक डोळा अथवा अवयव कायमस्वरूपी निकामी झाल्यास 1 लाख रुपयांचे अनुदान मिळते. या योजनेच्या लाभासाठी अपघातानंतर 30 दिवसांच्या आत सातबारा उतारा, मृत्यूचा दाखला, अधिकार फेरफार उतारा 6 ड, वारसनोंद उतारा 6 क, शेतकर्‍याच्या वयाचा दाखल्यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, प्रथम माहिती अहवाल, स्थळ पंचनामा, पोलिस पा. माहिती अहवाल, मरणोत्तर अहवाल, शवविच्छेदन अहवाल, वाहन परवाना, बाळंतपणात मृत्यू झाल्यास शासकीय आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकार्‍यांचे प्रमाणपत्र, अपंगत्व असल्यास प्रमाणपत्र आदी कागदपत्रे तालुका कृषी कार्यालयात 30 दिवसांत सादर करावी लागतात, परंतु माहिती नसल्याने शेतकरी वंचित राहतात.

काय आहे, मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना?
अपघातग्रस्त शेतकरी अथवा त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही योजना 2005-6 सालापासून राबविण्यात येत होती. या योजनेत बदल करून 19 एप्रिल 2023 पासून अपघाती मृत्यू, अपंगत्वास नवीन गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यास मान्यता दिली. आता शेतकर्‍यांसाठी अनुकूल कार्यपद्धती अवलंबली आहे.

राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचे प्रस्ताव मंजुरीचे अधिकार तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समितीस दिले आहेत. अपघातानंतर 30 दिवसांच्या आत वारसदारांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर करावा. कृषी कर्मचार्‍यांनी घटनास्थळी तत्काळ संपर्क करून नातेवाईकांना कागदपत्रांची माहिती द्यावी. सर्पदंश, अपघाताच्या घटनांमध्ये शविच्छेदन व पोलिस पंचनामा बंधनकारक आहे.
                                                          – माधव हासे, कृषीअधिकारी, अकोले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT