वाशिम : पुढारी वृत्तसेवा
वाशिमच्या रिसोड तालुक्यातील लोणी खुर्द येथील अनिरुद्ध भिकाजी गाडे या ५७ वर्षीय शेतकऱ्याने घराशेजारी असलेल्या विहिरीमध्ये गळफास घेतला. ही घटना आज होळीच्या पर्वावर घडल्याने गावात सर्वत्र दुःख पसरले आहे. भिकाजी गाडे यांच्याकडे ४ एकर शेती असून बँकेचे कर्जही होते. ते मागील काही महिन्यांपासून तणावात असल्याचे समजते. ऐन होळीच्या दिवशी शेतकऱ्याच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.