संग्रहित छायाचित्र. 
Latest

चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात शेतकर्‍याचा मृत्यू; मुल तालुक्यात वाघांचे हल्ले सुरूच

निलेश पोतदार

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : जनावरे चारण्यासाठी जंगलात गेलेल्या शेतकर्‍यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना काल (शुक्रवार) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास मुल तालुक्यातील पडझरी येथील वनविभागाच्या बफर झोन क्षेत्रात घडली. प्रमोद झुंगाजी मोहुर्ले (वय 42) असे मृताचे नाव असून तो पडझरी येथील निवासी होता.

प्रमोद मोहुर्ले हा शेतकरी नेहमीप्रमाणे भादुर्णीजवळ असलेल्या पडझरी येथील वनविभागाच्या बफर झोन क्षेत्रात स्वत:च्या मालकीची जनावरे चरण्यासाठी घेऊन गेला होता. जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. त्याचा जागीच मृत्यू झाला. सदर गटनेची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

या परिसरात वाघाचे हल्ले सातत्याने होत आहे. आतापर्यंत डझनभर नागरिकांचा बळी वाघाच्या हल्यात झाला आहे. वारंवार वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत असतानाही उपाययोजना करण्यास वनविभाग अपयशी ठरत आहे. काही दिवसांपूर्वी माजी मंत्री तथा भाजपच्या नेत्या शोभाताई फडणवीस यांनी वाघांचा बंदोबस्त करा अन्यथा कायदा हातात घेवून आम्हीच बंदोबस्त करू असा निर्वाणीचा इशारा दिला होता.

शिवाय चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेवून मागणी केली होती. उपाययोजना करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले होते. मात्र त्यानंतरही वाघाचे हल्ले थांबलेले नाहीत. शेतकरी, शेतमजूरांचे जीव जातच आहेत.

हे ही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT