Latest

बिग बॉस मराठीच्या घरातील विशाल निकमसाठी चाहत्यांचे प्रेम

स्वालिया न. शिकलगार

बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व एका सदस्यामुळे चांगलेच गाजत आहे. सुरुवातीला शांत, सालस आणि भावूक वाटणाऱ्या ह्या सदस्याने, वेळोवेळी स्वतःला सिद्ध करत आपल्यातला रांगडेबाज महाराष्ट्रातील जनतेसमोर आणला आहे. टास्कमध्ये स्वतःला झोकून देणारा हा सदस्य म्हणजे विशाल निकम !

बिगबॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातील लोकप्रिय सदस्यांच्या यादीत विशाल निकमचे नाव अग्रगण्य स्थानावर घ्यावे लागेल. कारण संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेल्या त्याच्या लाखो चाहत्यांचे विशालप्रेम त्याच्या सोबतीला आहे. खास करून सांगली, सातारा, विदर्भच्या प्रेक्षकांचे भरभरून प्रेम त्याला लाभत आहे. गेल्या आठवड्यातील भोपळ्याच्या टास्कमध्ये विशालने सहकारी मित्र विकास पाटीलसाठी बिगबॉसच्या घरातील जेल तोडल्यामुळे, शिक्षा म्हणून या आठवड्यासाठी त्याला बिगबॉसद्वारे थेट नॉमिनेट करण्यात आले आहे.

ज्यामुळे विशाल निकम याला वाचवण्यासाठी त्याचे चाहते सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसून येत आहे.

त्यांचे हे प्रेम ते विविध माध्यमातून सोशल मीडियावर व्यक्त करत आहे. वाशीम, विदर्भ येते राहणाऱ्या एका १० वर्षीय चिमुकल्याने विशालचे एक सुंदर चित्र काढत त्याच्यावरचे प्रेम सोशल मीडियाद्वारे व्यक्त केले आहे. वेद महेश सराफ असे या चिमुकल्याचे नाव असून तो इयत्ता सहावीत शिकतो. इतकेच नव्हे तर सांगलीतील श्रुतिका नामक एका चाहतीने देखील विशालचे पेन्सिल स्केच काढत, त्याला सपोर्ट केला आहे.

विशालचे चाहते सोशल मीडियावर विशलियन म्हणून प्रसिद्ध आहेत. ह्या विशलियन स्क्वेडमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, बिगबॉस मराठीच्या इतिहासात, पहिल्यांदाच सर्वात जास्त चाहतावर्ग कमावणारा कोणता सदस्य असेल तर तो विशाल निकम ठरला आहे !

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT