ढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध तमिळ अभिनेता मोहन यांचे वयाच्या ६० व्या वर्षी निधन झाले. त्यांचा मृतदेह मदुराईच्या रस्त्यावर आढळल्याची माहिती आहे. सुपरस्टार कमल हासन यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये सहकलाकार म्हणून भूमिका केल्या होत्या. (Actor Mohan ) त्यांचा मृतदेह तिरुपरंगुंद्रमच्या रस्त्यावर आढळला. असे म्हटले जात आहे की, अभिनेत्याची आर्थिक स्थिती अत्यंत हालाखीची होती. आर्थिक चणचणमुळे पोट भरण्यासाठी ते भिक मागत होते. (Actor Mohan )
माहितीनुसार, स्थानिक लोकांनी ३१ जुलै रोजी रस्त्यावर त्यांचा मृतदेह पडलेला आढळला. त्यांनी पोलिसांना सूचना दिली. त्यांची परिस्थिती इतकी खराब होती की, त्यांना ओळखणेही कठीण झाले होते.
एका इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह शवविच्छेदनासाठी मदुराई सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना निधनाची माहिती देण्यात आली.
मोहन हे तमिळ चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक होते. ते सपोर्टिंग रोल्स करायचे. कमल हासन यांच्या 'अपूर्व सगोथारार्गल' (Apoorva Sagotharargal) मध्ये भूमिकेनंतर त्यांना लोकप्रियता मिळाली होती. यामध्ये त्यांनी कमल हासन यांच्या मित्राची भूमिका साकारली होती. यानंतर ते 'अधिसया मणिथारगल' (Athisaya Manithargal) आणि 'नान कदवुल' (Naan Kadavul) , 'अप्पू राजा'सह काही चित्रपटांमध्ये दिसले होते.