kasturi

आयब्रोज करताना ‘अशी’ घ्या काळजी

अनुराधा कोरवी

भुवईला उठावदार करण्याच्या क्रियेला थ्रेडिंग किंवा आयब्रोज असे म्हणतात. स्वत:ला नीटनेटके ठेवणे, छान ठेवणे यासाठी हे आवश्यक ठरले आहे. आयब्रोज करताना थ्रेडिंगचा वापर जास्त प्रमाणात करतात. थ्रेडिंग म्हणजे धाग्याच्या साहाय्याने त्वचेवरील केस काढणे. या प्रकारात आपण भुवईला आकार देणे, असेही म्हटले जाते. कपाळ, हनुवटी तसेच चेहर्‍यावरील इतर भागावर याचा वापर केला जातो. तसेच हातापायावरील केसही थ्रेडिंगच्या साहाय्याने काढले जातात. थ्रेडिंग करण्यासाठी 40 क्रमांकाचा कॉटन अथवा वर्धमान कंपनीच्या धाग्याचा वापर केला जातो. या प्रक्रियेत केस उलट्या दिशेने काढले जातात. थ्रेडिंग कशी करावी व त्याची काळजी कशी करावी, यासाठी लागणार्‍या आवश्यक गोष्टी पुढीलप्रमाणे…

थ्रेडिंग करण्यापूर्वी ती जागा डेटॉलने चांगल्या प्रकारे स्वच्छ करावी. त्यानंतर पावडर लावावी. त्यामुळे आपल्या चेहर्‍यावरील घाम तसेच तेल कमी होण्यास मदत होते.

थ्रेडिंग केल्यानंतर जर रॅशेज किंवा त्वचा लाल होत असेल तर त्यावर सोप्रोमाईसिल किंवा मॉईश्चराईझर लावावे.

अंडाकार चेहरा असल्यास अशा चेहर्‍यावर छोट्या आणि थोड्या जाडसर आयब्रोज सूट होतात.

गोल चेहर्‍याच्या महिलांचे कपाळ मोठे असते. अशा चेहर्‍यावर लांब आणि बारीक टोकदार तसेच खाली झुकलेली भुवई चांगली दिसते.

चौरस चेहरा असणार्‍या महिलांचे कपाळ लहान असते. अशा चेहर्‍यावर अर्ध चंद्राकार आयब्रो चांगली दिसते.

त्रिकोणी चेहर्‍याच्या महिलांचे कपाळ छोटे असते. त्यामुळे अशा चेहर्‍यावर जाड पसरट भुवया सुंदर दिसतात.

पंचकोनी चेहरा असेल तर आयब्रोज जास्त लांब करू नयेत. तसेच टोकाला थोड्या बारीक ठेवावाव्यात.

नाक बारीक असलेल्या महिलांसाठी भुवया डोळ्याच्या जास्त वर न घेता नाकाच्याजवळून सुरुवात करावी. त्यामुळे डोळे लहान दिसणार नाहीत. (सौंदर्य)

SCROLL FOR NEXT