Latest

Esha Gupta : ‘आश्रम’ फेम ईशाची योगासनं!

Arun Patil

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड कलाकारांना बॉडी बनवण्याचं जेवढे वेड आहे, अभिनेत्री देखील आपल्या फिगरची काळजी घेताना दिसतात. यासाठी त्या तासनतास जीममध्ये घाम गाळत असतात. अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी ३० चा उंबरठा ओलांडल्यानंतरही अत्यंत अवघड योगासने आणि व्यायाम सहज करताना दिसतात. (Esha Gupta)

ईशा गुप्ता (Esha Gupta) बॉलिवूडमधील सर्वात हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. तिची एक झलक बघण्यासाठी तिचे फॅन्स आतुर असतात. सोशल मीडियावर तर तिचे बोल्ड आणि हॉट फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. जेव्हा जेव्हा ती तिचे सोशल मीडियावर फोटो शेअर करते तेव्हा चाहते देखिल हुरळून जातात.

ईशा गुप्ताला खर्‍या अर्थाने प्रसिद्धी मिळत आहे ती 'आश्रम-3' या वेबसीरिजमुळे. या सीरिजमध्ये तिने 'सोनिया' हे पात्र साकारले आहे. सोशल मीडियातही ती सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत असते.

सुंदर चेहरा आणि सुडौल शरीरयष्टी असलेल्या ईशामध्ये योगकौशल्यही आहेत. अतिशय अवघड योगासनेही ती लिलया करते व हेच तिच्या फिटनेसचेही रहस्य आहे. आता तिने सोशल मीडियात योगासने करीत असतानाचे काही फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यामधून तिच्या शरीराची लवचिकता, योगासनांचा तिने केलेला सराव व कौशल्य दिसते.

ईशा गुप्ता 'आश्रम 3' वेब सीरिजमध्ये सोनियाच्या भूमिकेत दिसली आहे. या वेब सीरिजला व यातील ईशा गुप्ताच्या कामाचे प्रेक्षकांनी व समिक्षकांनी सुद्धा कौतुक केले आहे. (Esha Gupta)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT