पुढारी ऑनलाईन : मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, आणि मल्याळम अशा सिनेमामध्ये अभिनेत्री नेहा पेंडसेने (Neha Pendse) काम केले आहे. या विविध भाषेच्या चित्रपट आणि मालिकांमधून नेहा सद्या घराघरात पोहोचली आहे. नेहा आपल्या चाहत्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमांमधून संपर्कात असते. नेहाची एक गोष्ट तिच्या चाहत्यांना माहीत नाही ती म्हणजे सहा मुलांची आई आहे?
नेहाने 'पटलं तर घ्या विथ जयंती' या शोमध्ये सहा गोंडस मुलांची आई असल्याचे सांगितले होते. यावेळी ती म्हणाली, सहा कुत्र्याची पिल्लं मी दत्तक घेतली आहेत. मी त्यांना मुलांप्रमाणे काळजी घेते. तिने पिल्लांसोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहे. तसेच पुढे ती म्हणाली, या सहा पिल्लामूळे बॉडीगार्डशिवाय राहू शकते, असे ती म्हणाली.
नेहा 'बिग बॉस 12'ची (Bigg Boss) स्पर्धक होती. नेहा वयाच्या 10 व्या वर्षी मनोरंजन सृष्टीत पदार्पण केले. सुरूवातीला तीला पहिल्या कामाचे 500 रुपये मानधन मिळाले. यानंतर तीने मागे वळून कधी पाहीलेच नाही. अनेक लोकप्रिय मालिका आणि चित्रपटात तिने काम केले. आता नेहाच्या आगामी चित्रपटांची वाट पाहत आहे.