पिंपरी : एच. ए. ग्राउंडच्या शेजारील रस्त्यावरील फूटपाथवर भाजीपाला विक्रेत्यांनी भाज्यांचे दुकान थाटली आहेत. त्यामुळे पादचार्यांना ये-जा करण्यास त्रास होत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने भाजीपाला विक्रीची व्यवस्था मार्केटमध्ये केलेली असून सुद्धा हे भाजीविक्रेते मार्केटमध्ये न बसता फूटपाथवर अनाधिकृतपणे भाजी विक्री करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना जाण्या-येण्यासाठी रस्त्याची व्यवस्था व्हावी म्हणून रस्त्याची रूंदी कमी करून पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुरक्षित फूटपाथ पिंपरी-चिंचवड क्षेत्रात तयार केलेले आहेत. परंतु, पिंपरी शहरात नेहरूनगर रोडकडे जाणार्या एच. ए. ग्राऊंडच्या
बाजूला भाजी विक्रेत्यांनी अनाधिकृतपणे अतिक्रमण केलेले आहे. त्यामुळे पादचार्यांना आपला जीव धोक्यात घालून रस्त्यावरून जाण्यास भाग पडत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात जाण्यासाठी वायसीएम रोड, डी. वाय. पाटील हॉस्पिटल, यशवंतनगर टेल्को रोड, नेहरूनगर स्टेडियम हे महत्त्वाचे रस्ते संतोषी माता चौकातून जातात. त्यामुळे या परिसरात नागरिकांची मोठी गर्दी असते. फळ भाजी विक्रेत्यांनी फूटपाथवर अनाधिकृतपणे भाजीपाला टाकून आपली दुकाने थाटली आहेत. त्यामुळे येणार्या-जाणार्या पादचार्यांना नाहक अडचण येत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे लक्ष याकडे कधी? जाणार याची चर्चा नागरिक करीत आहेत.
पादचारी नागरिक शिद्धार्थ सिरसाठ यांनी सांगितले, की फळभाजी विक्रेत्यांनी रस्त्यावर भाजीपाल्याचे दुकाने थाटल्याने फूटपाथवरून चालणे कठीण झाले आहे.त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेने अतिक्रमण करणार्यावर कडक कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली पाहिजे. पिंपरीकडे जाणार्या रोडवर फळविक्रेते भाजीपाला विक्रेते राजरोसपणे आपली दुकाने थाटून बसले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका नागरिकांना चालण्यासाठी सुसज्ज रस्ते मिळावे म्हणून प्रयत्न करताना दिसते; पण जिथे फूटपाथ नाहीत तिथे फूटपाथ टाकण्याची व्यवस्था पिंपरी-चिंचवड महापालिका करित आहे.
भाजीपाला व फळ विक्रेत्यांनी नेहरूनगर रोड एच. ए. ग्राउंडच्या बाजूच्या फुटपाथवर आपली भाजीचे दुकाने थाटल्याने पादचार्यांना नाहक त्रास सहन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने संबंधितांवर कारवाई करुन फूटपाथ नागरिकांसाठी चालण्यास उपलब्ध करावा, अशी मागणी केली जात आहे.
हेही वाचा: