Emraan Hashmi Mallika Sherawat  
Latest

Emraan Hashmi-Mallika Sherawat : Kiss वरून वाद २० वर्षांनंतर संपुष्टात; इमरान हाश्मी-मल्लिका शेरावत पुन्हा आले एकत्र (Video)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : इमरान हाश्मी-मल्लिका शेरावत यांच्यातील २० वर्षांपूर्वीचा वाद संपुष्टात आला आहे. २० वर्षांनी मर्डर चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी इमरान – मल्लिका यांच्यात भांडण झाले होते. अखेर हे भांडण विसरून दोघांनी पुन्हा मैत्री केली आहे. इमरान- मल्लिकाने एकमेकांना आलिंगन देत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. (Emraan Hashmi-Mallika Sherawat) निर्माते आनंद पंडित यांच्या मुलीच्या रिसेप्शनमध्ये इम्रान आणि मल्लिका पोहोचले. दोघे गुरुवारी मुंबईमध्ये वेडिंग रिसेप्शनमध्ये भेटले. दोघांनी एकत्र रेड कार्पेटवर पोज देखील दिले. (Emraan Hashmi-Mallika Sherawat)

इमरान हाश्मी – मल्लिका शेरावत वेडिंग रिसेप्शनमध्ये एकमेकांना पाहून हसले. त्यानंतर दोघांनी आलिंगन दिलं.

फॅन्सनी दिली कॉमेंट

इम्रान आणि मल्लिकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅन्स खूप साऱ्या कॉमेट्स देताना दिसत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले- ती स्टनिंग दिसत आहे. मला आजदेखील वाटते की, त्यांचे मैया मैया गाणे एपिक होतं. दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं- बेस्ट पेयर. आणखी एका युजरने लिहिलं- इमरान ब्लश करत आहे.

video-Voompla instagram वरून साभार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT