Latest

घाबरू नका ! तुमच्या मोबाईलवरही आज एमर्जन्सी अलर्ट आला का ? मग हे जरूर वाचा

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन : आज अनेकजणांच्या मोबाईलवर एमर्जन्सी कॉल अलर्ट आले आणि तुमच्या आमच्यापैकी अनेकांना याबाबत कल्पना आली नाही. काहीना फोन हॅक झाल्याची शंकाही येऊ लागली. तुमच्याबाबतही असं झालं असेल तर अजिबात घाबरू नका. 'Emergency alert : Severe. This is test alert from Department of Telecommunications, government of india. 20-07-2023' असा मेसेज अनेकांच्या मोबाइलवर झळकला. यासोबतच 'हा भारत सरकारच्या दुरसंचार विभागाकडून एक चाचणीचा इशारा आहे. 20-07-2023' हा मराठीमधील मेसेजही झळकला.

नक्की काय आहे हा प्रकार ? 

ही यंत्रणा म्हणजे विशिष्ट स्थानांवर काही आपत्कालीन सूचना पाठवण्यासाठी मोबाईल अलर्ट सिस्टम आहे. आपत्ती काळात ही यंत्रणा वापरली जाणार आहे. भूकंप, वादळांसारख्या परिस्थितीमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित केली जाऊ शकते. सध्या जिओ सीम असलेल्या ग्राहकांनाच हा कॉल आला. यात कोणीही घाबरून जाण्याचे कारण नसल्याचेही सायबर पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT