Latest

Tesla ने बाजारातून परत मागवली सव्वालाख वाहने, तांत्रिक बिघाडामुळे अपघाताचा धोका

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : अब्जाधीश उद्योगपती एलन मस्क यांची कंपनी टेस्ला (Tesla) अमेरिकेच्या बाजारातून मॉडेल एस (Model S) आणि मॉडेल एक्स (Model X) ची १ लाख २० लाख वाहने परत मागवत आहे. कारण अपघातादरम्यान या वाहनांचे दरवाजे अनलॉक होण्याचा आणि उघडण्याचा धोका आहे. यामुळे ही वाहने बाजारातून परत मागवली असल्याचे टेस्लाने म्हटले आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी अॅडमिनिस्ट्रेशन (NHTSA) चे म्हणणे आहे की, टेस्लाने २०२१-२०२३ मॉडेल वर्षांसाठी ओव्हर-द-एअर (OTA) सॉफ्टवेअर अपडेट जारी केले आहे, जे साइड-इफेक्ट संरक्षणासाठी फेडरल सुरक्षा मानकांचे पालन करत नाही.

टेस्लाने शुक्रवारी एनएचटीएसए (NHTSA) सोबत केलेल्या फाइलिंगमधून सांगितले होते की, या महिन्याच्या सुरुवातीला नियमित क्रॅश चाचणीदरम्यान नॉन-स्ट्रक साइडवर इम्पॅक्ट झाल्यानंतर केबिनचा दरवाजा उघडलेला दिसला. चाचणी वाहन लॉकआउट कार्यक्षमतेशिवाय चालत होते, जे टेस्लाने शोधून काढले. ते अनवधानाने २०२१ च्या उत्तरार्धापासून जारी केलेल्या सॉफ्टवेअर अपडेट्समधून वगळण्यात आले होते. या समस्येशी संबंधित कोणताही वॉरंटी क्लेम केला आहे की नाही अथवा कोणतीही दुर्घटना झाली की नाही याची त्यांना माहिती नव्हती.

गेल्या आठवड्यात टेस्लाने अमेरिकेतील सर्व २० लाखांहून अधिक वाहने परत मागवली. वाहनांमधील दोषपूर्ण प्रॉडक्ट्स बदलणे अथवा दुरुस्त करणे ही देशातील सर्वात मोठी रिकॉल कारवाई आहे. NHTSA ने सुरक्षेबाबच चिंता व्यक्त केल्यानंतर टेस्लाने त्याच्या ऑटोपायलट अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर-सहाय्य प्रणालीमध्ये नवीन सुरक्षा उपाय इन्स्टॉल करण्यासाठी वाहने परत मागवली आहेत.

ओहायो मधील टेस्लाच्या वाहन संशोधन आणि चाचणी केंद्रात अनेक Tesla वाहने आहेत जी ते कोणत्याही समस्यांचे निराकरण करण्याच्या मार्गांचे मूल्यांकन करण्यासाठी वापरतील, असे एनएचटीसीएने सांगितले.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT