Latest

Shinde Govt Cabinet : वीज दर प्रति युनिट एक रुपयाने कमी होणार

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाची कॅबिनेट मिटींग आज झाली. या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

कॅबिनेट बैठकीतील निर्णय

राजकीय व सामाजिक आंदोलनातील मार्च 2022 पर्यंतचे खटले मागे घेण्याबाबत कार्यवाही
हिंगोली जिल्ह्यात 'मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र'
शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान. पूर व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सुद्धा लाभ
ग्रामीण भागातील भूमिहीन लाभार्थीना जागा देण्याबाबत विविध सवलती
पश्चिम महाराष्ट्रातील शेतक-यांना सरसकट मदत देण्यात येणार
राज्यात वीज वितरण यंत्रणा सुधारणार. ग्राहकांना स्मार्ट व प्रिपेड मीटर्स.
वीज दर प्रति युनिट एक रुपयाने कमी करण्याचा निर्णय, आता हा दर 2 रुपये 16 पैसे ऐवजी 1 रुपये 16 पैसे असेल
घरकुल मुद्रांक शुल्क 1 हजार रुपये
लोणार सरोवर संवर्धनासाठी 370 कोटी
15 मेडिकल कॉलेजमध्ये 50 जागा वाढवण्यात येणार
मराठवाड्यातील हळद संशोधन केंदासाठी 100 कोटींचा निधी
जळगाव जिल्ह्यातील वाघुर प्रकल्पास 2 हजार 288.31 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता
ठाणे जिल्ह्यातील भातसा पाटबंधारे प्रकल्प 1 हजार 491.95 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता.
राज्यात कायमस्वरुपी विनाअनुदान तत्वावर 3 नवीन समाजकार्य महाविद्यालये स्थापणार
ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना प्रकल्पास 890.64 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता
अतिउच्चदाब, उच्चदाब व लघुदाब उपसा जलसिंचन योजनेच्या शेतकऱ्यांना वीज दरात सवलत देणार.
दुय्यम न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती
महावितरण व बेस्ट उपक्रमामार्फत सुधारित वितरण क्षेत्र योजना-सुधारणा अधिष्ठित आणि निष्पत्ती-आधारित योजना
विधि व न्याय विभागात सह सचिव (विधि) (गट-अ) पद नव्याने निर्माण करणार
लोणार सरोवर जतन, संवर्धन व विकास आराखड्यास मान्यता.
15 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वाढलेल्या ५० अतिरिक्त जागांसाठी राज्याचा हिस्सा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT