Air taxi 
Latest

भारतात 2026 मध्ये येणार इलेक्ट्रिक एअर टॅक्सी

Arun Patil

नवी दिल्ली : भारतात टॅक्सी काही नवी नाही. अनेक दशकांपासून आपल्या देशाच्या विविध शहरांमध्ये लोक टॅक्सीने प्रवास करीत आले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये टॅक्सी बुकिंगमधील पद्धतीत बदल घडले. आता अनेक टॅक्सी अ‍ॅग्रीगेटर आले आहेत, जे आपल्याला मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन टॅक्सी बुकिंगची सुविधा देतात. अनेक शहरांमध्ये मोटारींबरोबरच बाईक टॅक्सीही उपलब्ध आहे. मात्र आता आगामी काळात नवी टॅक्सी येणार आहे. भारतात 2026 पर्यंत पहिली इलेक्ट्रिक एअर टॅक्सी Air taxi सुरू होऊ शकते. या टॅक्सीमुळे दीड तासांचा प्रवास सात मिनिटात होईल!

देशातील सर्वात मोठी एअरलाईन 'इंडिगो'ला संचालित करणार्‍या 'इंटरग्लोब एंटरप्राइजेस' ने अमेरिकेच्या 'आर्चर एव्हिएशन'शी याबाबत करार केला आहे. 'आर्चर एव्हिएशन' इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेकऑफ Air taxi आणि लँडिंग एअरक्राफ्ट बनवते. दोन्ही कंपन्यांमध्ये झालेल्या समझोत्यानुसार आर्चरची 200 विमाने खरेदी केली जातील.

या विमानात चारजण बसू शकतात. याचा अर्थ ही 'फोर सीटर एअर टॅक्सी' Air taxi असेल. तिच्यासाठी रनवेची गरज भासत नाही. हे विमान हेलिकॉप्टरप्रमाणे व्हर्टिकल टेकऑफ आणि लँडिंग करू शकते. ते ताशी 240 किलोमीटर वेगाने 160 किलोमीटरचे अंतर कापू शकते. या इलेक्ट्रिक एअर टॅक्सीने 27 किलोमीटरचे अंतर केवळ सात मिनिटात पार करता येते. सध्याच्या कार टॅक्सीने त्यासाठी दीड तासांचा वेळ लागतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT