Latest

ECI Commissioner Arun Goel Resigns : मोठी बातमी! आचारसंहिता लागण्यापूर्वीच निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा तडकाफडकी राजीनामा

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुढच्या अठवडाभरात निवडणूक आयोग 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता वर्तविली जात असताना एक मोठी माहिती समोर आली आहे. निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी आज (दि. ९) आपला राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. गोयल यांच्या राजीनाम्यामुळे, भारत निवडणूक आयोग (ECI) आता फक्त एक सदस्यीय मंडळ आहे. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) राजीव कुमार यांनी. गोयल यांच्या कार्यकाळात तीन वर्षे शिल्लक असताना त्यांची रवानगी होत आहे. (Election Commission of India)

अरुण गोयल यांनी दिलेला राजीनामा मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त (नियुक्ती, सेवाशर्ती आणि पदाचा टर्म) कायदा, 2023 च्या कलम 11 च्या खंड (1) नुसार, स्वीकारण्यात आला आहे. गोयल यांच्या राजीनाम्यामुळे आता संपूर्ण निवडणूक यंत्रणेवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यावर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT