पुढारी ऑनलाईन डेस्क : अफगाणिस्तान भूकंपाने दिवशीही हादरलं आहे. सलग दुसऱ्या दिवशीही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल ४.७ इतकी होती. गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के सातत्याने जाणवत आहेत. मंगळवारीही येथे भूकंपाचे धक्के जाणवले होते. (Earthquake in Afghanistan)
माहितीनूसार अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.7 इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, गुरुवारी सकाळी ७:०६ वाजता झालेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानातील फैजाबाद येथे होता. सध्या या भूकंपात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानमध्ये सतत भूकंपाचे धक्के बसत आहेत. मंगळवारीही अफगाणिस्तानमध्ये ४.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) च्या मते, यापूर्वी मंगळवारी अफगाणिस्तानमध्ये ४.१ तीव्रतेचा भूकंप झाला होता. दुसरीकडे, २ मार्च रोजी अफगाणिस्तानच्या फैजाबाद भागात ४.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. दोन्ही भूकंपात कोणतीही हानी झालेली नाही.
तुर्कस्तानमध्ये फेब्रुवारी महिन्यातच मोठा भूकंप झाला होता, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली होती. या भूकंपात अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या तर ५० हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ७.८ तीव्रता होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू तुर्कस्तानच्या दक्षिणेकडील गाझियानटेप होता. यातून सावरल्यानंतर काही वेळातच दुसरा भूकंप झाला, त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.४ तीव्रता होती.
हेही वाचा