पुढारी ऑनलाईन डेस्क : अफगाणिस्तानात आज(दि. ६) संध्याकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. शनिवारनंतर आजचा दुसरा धक्का आहे. ५.२ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा हा आजचा भूकंप होता.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या फैजाबादपासून १९ किमी एसएसई येथे संध्याकाळी ६:५३ वाजता रिश्टर स्केलवर ५.२ तीव्रतेचा भूकंप नोंदवला गेला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने नोंदवले की त्याचा केंद्रबिंदू जमिनीपासून ८५ किलोमीटरवर होते. शनिवारी संध्याकाळी देखील हे धक्के जाणवले होते.