RBI 
Latest

नोटांची जागा घेण्यासाठीच आज लाँच होणार ई-रुपया

अमृता चौगुले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था :  'डिजिटल रुपया' हा तुम्ही अदा केल्याक्षणी समोरच्याच्या खात्यात जमा झालेला असतो. सध्या होत असलेले यूपीआय आदी डिजिटल व्यवहार हे कुठल्या तरी बँकेच्या खात्यात जमा असलेल्या रुपयांचे हस्तांतरण आहे; पण 'सीबीडीसी'चे (डिजिटल चलन) तसे नाही आणि म्हणूनच डिजिटल रुपया हा नोटांची जागा घेणार आहे.

किंबहुना, रिझर्व्ह बँकेने नोटा, नाणी संपुष्टात आणून डिजिटल चलन सार्वत्रिक व्हावे, या हेतूनेच सामान्यांसाठीही ई-रुपया गुरुवारी (१ डिसेंबर) लाँच करण्याचे ठरविले अनेक डिजिटल पर्याय उपलब्ध असताना 'सीबीडीसी' का म्हणून वापरावे, ४८ तासांपर्यंतचा कालावधी लागू शकतो. डिजिटल रुपयाचे तसे नाही. तो तत्क्षणी अदा होतो. (सीबीडीसी) ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित असेल. घाऊक डिजिटल चलनाचा वापर बँकांसारख्या वित्तीय संस्था करतील, त्याप्रमाणेच किरकोळ डिजिटल चलनाचा वापर सामान्य माणूस करू शकेल.

ई- रुपया तूर्त चार बँकांच्या माध्यमातून डिजिटल वॉलेटच्या साहाय्याने वितरित केला जाईल. किरकोळ डिजिटल चलनाच्या पहिल्या टप्प्यात स्टेट बँक, येस बँक, आयसीआयसीआय आणि आयडीएफसी फर्स्ट या ४ बँकांच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात मुंबई, दिल्ली, बंगळूर, भुवनेश्वर या शहरांतून सर्वसामान्यांच्या वापरासाठी ई-रुपया लाँच होणार आहे. या बँकांच्या माध्यमातून ग्राहकांना उपलब्ध करून पुढे काय?

डिजिटल रुपयाचा वापर सार्वत्रिक झाल्यानंतर केव्हा आणि किती डिजिटल रिझर्व्ह बँकेचे हे डिजिटल चलन चलन जारी करायचे ते रिझर्व्ह बँकेच्या हातात असेल. बाजारातील चलनाच्या अल्प, अति उपलब्धतेचे व्यवस्थापन करणे रिझर्व्ह बँकेला सोपे जाईल. देण्यात आलेल्या अॅप्समध्ये तसेच मोबाईल फोन तसेच अन्य डिव्हाईसमध्ये स्टोअर असलेल्या डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून ई- रुपयांत लोक देणे-घेणे करू शकतील…

मोबाईल फोनच्या मदतीने एकमेकांना या रुपयांत रक्कम पाठविता येईल. वस्तू विकत घेता येतील. डिजिटल रुपयाच्या वापरासाठी पहिल्या टप्प्यात इको सिस्टीम विकसित केली जाईल. डिजिटल रुपया वापरायचा, तर तुमच्याकडे संबंधित बँकेने पुरविलेले डिजिटल वॉलेट हवे. ज्याला तुम्हाला पेमेंट करायचे त्या दुकानदाराकडे डिजिटल रुपया स्वीकारण्यासाठीचा  क्यूआर कोड हवा. दोन व्यक्तींना आपसात व्यवहार करायचा असेल; तर दोहोंकडे डिजिटल वॉलेट हवे.

ई रुपया ही काही अगदीच नवी कल्पना नाही. बिटकॉईनसारख्या क्रिप्टो करन्सीतून ती पुढे आली. २००९ पासून आतापावेतो किती तरी क्रिप्टो करन्सी लाँच झाल्या आहेत. लोक त्यात गुंतवणूकही करत आहेत. अर्थात, हा पूर्णपणे एक खासगी उद्योग आहे. बेकायदा आहे. मागणी आणि पुरवठ्याच्या हिशेबाने तिची किंमत ठरते. यात जोखीम आहे, ई- रुपया हा रिझर्व्ह बँकेचा असल्याने जोखीम हा विषयच इथे नाही.

ई- रुपयाने बँकांना पैशांचे हस्तांतरण करणे सोपे होईल. चलन छपाईचा खर्च वाचेल. नकली नोटांचा प्रश्न मिटेल. करवसुली सुलभ होईल. मनी लाँडरिंगला आळा बसेल. तुम्ही सध्या कुठल्याही बँक खात्याच्या मध्यस्थीशिवाय खिशातील नोटा, नाणी खर्च करत आहात. तसेच आगामी काळात तुम्ही कुठल्याही बँक खात्याच्या मध्यस्थीशिवाय तुमच्या डिजिटल वॉलेटमधले ई-रुपये खर्च कराल. -व्ही. वैद्यनाथन, एमडी, सीईओ, आयडीएफसी फर्स्ट बँक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT