Latest

या वादग्रस्त ट्वीटमुळे किम कर्दाशियनच्या माजी नवऱ्याचं हँडल झालं सस्पेंड

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : वाद आणि सेलिब्रिटी हे समीकरण नवीन नाही. एखादी कलाकृती असो किंवा सार्वजनिक जीवनातील एखादी कृती. सेलिब्रिटी अगदी सहज ट्रोलर्सच्या रडारवर येतात. पण काही सेलिब्रिटी मात्र जाणीवपूर्वक वाद ओढवून घेताना दिसतात. किम कर्दाशियनचा माझी नवरा आणि प्रसिद्ध रॅपर कान्ये वेस्ट यानेही असंच काहीसं केलं आहे. कान्येने आता थेट ट्वीटरच्या एलन मस्कशी पंगा घेतला आहे. ट्वीटरने नुकतंच त्याचं हँडल सस्पेंड केलं आहे. द्वेष पसरवणारं ट्वीट केल्याप्रकरणी हा निर्णय घेतल्याचं समजत आहे. अलीकडेच त्याने एका इंटरव्ह्यूमध्ये हिटलरची स्तुती करणारी विधानं केली  होती.

त्यानंतर कळस म्हणजे त्याने केलेल ट्वीट. कान्येने हिटलरच्या पक्षाची निशाणी असलेलं स्वस्तिक पोस्ट केलं होतं. यानंतर मात्र ट्वीटरने लगेच अॅक्शन घेत कान्येचं अकाऊंट सस्पेंड केलं आहे. खरं तर कान्येचं अकाऊंट सस्पेंड होण्याची ही दुसरी वेळ आहे. या प्रकरणावर एकाने एलनच्या ट्वीटवर कमेंट करत त्याचं अकाऊंट पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे.

या कमेंटला उत्तर देताना एलन म्हणतो, 'मी माझ्यापरीने खूप प्रयत्न केला. हिंसा भडकवण्याच्या आमच्या पॉलिसीचा भंग झाल्यावर माझा नाईलाज झाला.' पण हे होऊनही शांत बसेल तो कान्ये वेस्ट कसला ! ट्वीटर बंद झाल्यावर त्याने इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन एलन मस्कवर टीकेची झोड उठवली आहे. एलन हा हाफ चायनीज असल्याची पोस्ट कान्येने शेयर केली आहे. आता या दोन सेलिब्रिटीमध्ये सोशल मीडिया वॉर रंगण्याची चिन्ह आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT