Drishyam 2 OTT 
Latest

Drishyam 2 OTT : ‘दृश्यम २’ चा ४२ व्या दिवशीही दबदबा, ओटीटीवर पाहता येणार

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचा सिंघम अजय देवगन आणि तब्बू स्टारर चित्रपट 'दृश्यम २' (Drishyam 2 OTT) थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहेत. या चित्रपटाने वर्ल्डवाईड ३०० कोटींचा आकडा पार केला आहे. चित्रपट रिलीजनंतर ४२ व्या दिवशी देखील लोक हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. सस्पेंसने भरपूर दृश्यम २ एक असा चित्रपट आहे, जो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. (Drishyam 2 OTT)

'थँक गॉड'नंतर अजय देवगनचा चित्रपट 'दृश्यम २' देखील डिजिटल प्लॅटफॉर्म ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर रिलीज करण्यात आलाय.

या महिन्यात फ्रीमध्ये स्ट्रीम होऊ शकतो चित्रपट 

दृश्यम- २ ची मागणी पाहता २६ जानेवारीच्या जवळपास ॲमेझॉन प्राईमवर हा चित्रपट फ्री-स्ट्रीम केला जाईल. या चित्रपटात अजय देवगन, तब्बू, अक्षय खन्ना, इशिता दत्ता, श्रिया सरन यांच्याही मुख्य भूमिका आहेत. दृश्यम-२ ने इंडियन बॉक्स ऑफिसवरील आतापर्यंत २३० कोटी आणि वर्ल्डवाईड ३२९ कोटींच्या जवळपास कमाई केलीय. आता निर्माते या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाविषयी विचार करत आहेत.

'दृश्यम २' बॉक्स ऑफिस कलेक्शन

पहिला आठवडा- १०४.६६ कोटी
दुसरा आठवडा- ५८.८२ कोटी
तिसरा आठवडा- ३२.८२ कोटी
चौथा आठवडा- १९.४० कोटी
पाचवा आठवडा- ८.९८ कोटी
सहावा आठवडा- ६.०२ कोटी
एकूण – २३० कोटी

अजय देवगनचे चित्रपट

'दृश्यम २' नंतर अजय देवगन चित्रपट 'भोला' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये अजय पुन्हा एकदा तब्बूसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय, अजय देवगनकडे 'सिंघम'चा सीक्वल आहे. या चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी सुरू होणार आहे. या चित्रपटाचे टायटल आहे 'सिंघम अगेन'. 'सिंघम अगेन' मध्ये दीपिका पादुकोण लेडी सिंघमच्या भूमिकेत दिसेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT