पुणे; पुढारी वृत्तसेवा : 'राईज अप' महिलांच्या जलतरण स्पर्धेच्या 17 वर्षांखालील गटामध्ये 200 मीटर फ्रीस्टाईल प्रकारामध्ये क्रीडा प्रबोधिनीच्या डॉली पाटीलने 2.27.32 ची वेळ नोंदवत सुवर्णपदक, क्रीडा प्रबोधिनीच्या दीक्षा यादवने 2.29.22 ची वेळ नोंदवत रौप्य, तर क्रीडा प्रबोधिनीच्या पूर्वा गावडेने 2.33.81 ची वेळ नोंदवत कांस्यपदक पटकाविले. 'पुढारी'च्या वतीने 'राईज अप' महिलांची जलतरण स्पर्धा डेक्कन जिमखाना टिळक तलावामध्ये आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेच्या 15 वर्षांखालील 200 मीटर फ्रीस्टाईल प्रकारामध्ये सीएसीच्या मिथाली चिटणीस हिने 2.36.72 ची वेळ नोंदवत सुवर्ण, मेट्रो सिटीच्या उर्वीत्रिशा चतुर्वेदी हिने 2.43.84 ची वेळ नोंदवत रौप्य, तर सीएसीच्या अनुष्का पुंडेने कांस्यपदक पटकाविले. 13 वर्षांखालील गटाच्या 200 मीटर फ्रीस्टाईल प्रकारात सीएसीच्या मिल्की मकवानाने सुवर्ण, हार्मनी क्लबच्या तिविशा दीक्षितने रौप्य, तर सीएसीच्या साक्षी दांगटने कांस्यपदक पटकाविले.
11 वर्षांखालील गटाच्या 200 मीटर फ्रीस्टाईल प्रकारात सीएसीच्या मिनेर्वा पाटीने 2.37.85 ची वेळ नोंदवत सुवर्ण, सीएसीच्या अनुष्का विजापूरने 2.45.94 ची वेळ नोंदवत रौप्य, तर मेट्रोसिटीच्या शिवानी कुर्हाडेने 3.00.25 ची वेळ नोंदवत कांस्यपदक पटकाविले. 9 वर्षांखालील गटामध्ये 200 मीटर फ्रीस्टाईल प्रकारामध्ये सीएसीच्या अथश्री ढगेने 3.05.66 ची वेळ नोंदवत सुवर्ण, मेट्रोसिटीच्या अनक्षा काळेने 2.12.60 ची वेळ नोंदवत रौप्य, तर शार्क अॅक्वेटिक क्लबच्या लावण्या कराडेने 3.14.25 ची वेळ नोंदवत कांस्यपदक पटकाविले.
या स्पर्धा मुख्य प्रायोजक ऑक्सिरीच, हेल्थ पार्टनर डॉ. ऑर्थो, अॅकॅडमिक पार्टनर सूर्यदत्ता एज्युकेशन इन्स्टिट्यूट, फायनान्शिअल पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी, मीडिया पार्टनर झी टॉकीज या सर्व प्रायोजकांच्या सहकार्याने सुरू आहेत.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे (अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्यविजेते) ः 17 वर्षांखालील (100 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक) ः भक्ती वाडेकर (क्रीडा प्रबोधिनी), सृष्टी भोसले (क्रीडा प्रबोधिनी), अर्चिता कपिल (डीआरव्हीपीएफ). 15 वर्षांखालील (10 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक) ः समृद्धी जाधव (क्रीडा प्रबोधिनी), मैथिली चिटणीस (सीएसी), सई कामत (डीजी). 13 वर्षांखालील (100 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक) ः समृध्दी मारणे (मेट्रोसिटी), त्विशा दीक्षित (हार्मनी क्लब), रुची भगत (सीएसी). 7 वर्षांखालील (50 बॅक स्ट्रोक) ः अन्वी कुलकर्णी (मेट्रोसिटी), श्रवय्या शिवकुमार (मेट्रोसिटी), वेदश्री दांगट (मेट्रोसिटी). 9 वर्षांखालील (50 बॅक स्ट्रोक) ः अनिषा काळे (मेट्रोसिटी), सिया चौधरी (सोलारिस क्लब), लावण्या करडे (शार्क अॅक्वेटिक क्लब).
11 वर्षांखालील (50 बॅक स्ट्रोक) ः अमोली नेर्लेकर (सीएसी), अनुष्का विजापूर (सीएसी), मिनेर्वा पटी (सीएसी).13 वर्षांखालील (50 बॅक स्ट्रोक) ः मिल्की मकवाना (सीएसी), साक्षी दांगट (सीएसी), त्विशा दीक्षित (हार्मनी क्लब). 15 वर्षांखालील (50 बॅक स्ट्रोक) ः संजना पाला (डीआरव्हीपीएफ), अनुष्का पुंडे (सीएसी), सई कामत (डीजी).
17 वर्षांखालील (50 बॅक स्ट्रोक) ः भक्ती वाडेकर (क्रीडा प्रबोधिनी), श्वेता कुर्हाडे (क्रीडा प्रबोधिनी), अक्षजा दीक्षित (सीएसी). 13 वर्षांखालील (100 मीटर बटरफ्लाय) ः सराक्षी दांगट (सीएसी), रुची भगत (सीएसी), त्विशा दीक्षित (हार्मनी क्लब). 15 वर्षांखालील (100 मीटर बटरफ्लाय) ः अनुष्का पुंडे (एसएफसी), श्रेया नामदे (शार्क अॅक्वेटिक क्लब), निहिता चोरगे.
17 वर्षांखालील (100 मीटर बटरफ्लाय) ः दीक्षा यादव (क्रीडा प्रबोधिनी), कनक धुमाळ, डॉली पाटील (क्रीडा प्रबोधिनी).
7 वर्षांखालील (50 ब्रेस्ट स्ट्रोक) ः शर्वया शिवकुमार (हार्मनी क्लब), तिया ओसवाल (शार्क अॅक्वेटिक क्लब), वेदश्री दांगट (मेट्रोसिटी).
9 वर्षांखालील (50 ब्रेस्ट स्ट्रोक) ः सानिका शेळके (मेट्रोसिटी), स्वरा कुलकर्णी (डीजी), अनिषा काळे (मेटोसिटी).
11 वर्षांखालील (50 ब्रेस्ट स्ट्रोक) ः झेल मालाणी (डीजी), काव्या रिसबुड (हार्मनी), धवाजा जैन (सीएसी) व अद्विती सावंत (एसएफसी).
13 वर्षांखालील (50 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक) ः समृध्दी मारणे (मेट्रोसिटी), त्विशा दीक्षित (हार्मनी), साक्षी दांगट (सीएसी).
15 वर्षांखालील (50 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक) ः मैथिली चिटणीस (सीएसी), संजना पाला (डीआरव्हीपीएफ), समृध्दी जाधव (क्रीडा प्रबोधिनी).
17 वर्षांखालील (50 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक) ः कनक धुमाळ (एसएफसी), शृष्टी भोसले (क्रीडा प्रबोधिनी), अर्चिता पाटील (डीआरव्हीपीएफ).
वेगवेगळ्या सामाजिक विषयात अग्रेसर भूमिका घेणार्या दै. 'पुढारी'ने केवळ महिलांसाठी स्पर्धा आयोजित करून स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करून महिलांना मोठे व्यासपीठ दिले असून, या स्पर्धांना पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. अशाच प्रकारच्या स्पर्धा दरवर्षी भरवून महिलांना संधी द्यावी.
– मिलिंद पोकळे,
संचालक, कॉसमॉस बँक